मुक्तपीठ टीम
रिलायन्स अनेक प्रसिद्ध स्थानिक ग्राहक ब्रँड्सशी चर्चा करत आहे. त्याचं कारण आहे भारतीय ग्राहकोपयी वस्तूंच्या बाजारपेठेतील ग्लोबल ब्रँड्सचं वर्चस्व. रिलायन्सने नवीन बिझनेस प्लॅनसह परदेशी कंपन्यांना आव्हान देण्याचे नियोजन केले आहे. देशातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता कंपनी रिलायन्स आता अनेक छोटे किराणा ब्रॅंड्स आणि नॉन-फूड ब्रँड्स विकत घेण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. युनिलिव्हरसारख्या परदेशी कंपन्यांना आव्हान देण्यासाठी कंपनीने साडेसहा अब्ज डॉलर ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसायाचे लक्ष्य ठेवले आहे.
रिलायन्स पुढील सहा महिन्यांत ५० ते ६० किराणा, घरगुती आणि पर्सनल अॅक्सेसरीज ब्रँडचा पोर्टफोलिओ तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी ते वितरकांची टीम तयार करत आहेत, ज्याच्या मदतीने ते देशभरातील मोठ्या रिटेल आउटलेट्सपर्यंत पोहोचू शकतात.
ग्लोबल ब्रँड्सशी लोकल ब्रँडच्या साथीनं टक्कर
- नवीन बिझनेस प्लॅनसह रिलायन्स आता नेस्ले, युनिलिव्हर, पेप्सिको इंक आणि कोका-कोला यांसारख्या जगातील काही मोठ्या ग्राहक समूहांना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.
- या कंपन्या अनेक दशकांपासून भारतात कार्यरत आहेत.
- रिलायन्सची ३० मोठ्या आणि प्रसिद्ध स्थानिक ग्राहक ब्रँडशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
- रिलायन्स हे ब्रँड पूर्णपणे विकत घेईल किंवा संयुक्त उद्योग स्थापन करेल.
- रिलायन्सने पाच वर्षांत ५०० अब्ज रुपयांचे वार्षिक विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.
- ३० मोठ्या स्थानिक ग्राहक ब्रँड्ससोबत अधिग्रहणाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.