Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल – उपमुख्यमंत्री अजित पवार

May 16, 2022
in सरकारी बातम्या
0
Karmaveer Bhaurao patil

मुक्तपीठ टीम

सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत, यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर १ लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. संस्था चालविणाऱ्या संचालकांनी शासनाचे धोरण व सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.      

Karmaveer Bhaurao patil

कोल्हापूर रोड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, मर्या सांगली यांच्या नुतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, कार्यक्रमास  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील उपस्थित होते.      

सहकारी पतसंस्थांसमोर फार मोठी आवाहने आहेत, संपुर्ण सहकार क्षेत्रासमोरच अनेक अडचणी आहेत. तरीसुध्दा या सर्व अडचणींवर मात करुन सहकार पुढील वाटचाल करीत आहे. सहकाराच्या सक्षमीकरणासाठी शासनही पुढाकार घेत आहे. वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकारी संस्थां योग्य चालण्यासाठी संस्थेतील संचालकांचा कार्यभारही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे संचालकांची आपल्या सभासदाचे व संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख व पारदर्शी करावे त्यामध्ये व्यवसायिकता यावी व आधुनिकीकरणाचा अवलंब करावा, यामध्ये डिजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंगसेवा उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत शासन नेहमीच सहकारी संस्थांच्या पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी सांगितले

Karmaveer Bhaurao patil

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची इमारत ही अत्यंत देखणी उभारण्यात आली असून ती सांगली शहराच्या वैभवात भर घालेल, असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यामध्ये अनेक कार्यक्रमांसाठी जाणे होते पण एकाद्या पतसंस्थेची अशी इमारत पाहण्यात आली नाही. ही वास्तु अत्यंत सुंदर पध्दतीने तयार करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या जवळपास ५१ शाखा कार्यरत आहेत. आता आणखी १० शाखा सुरु होणार आहेत. या संस्थेतून चालणारा कारभार कर्मवीर अण्णांच्या नावाला शोभेल अशा पध्दतीचे आहे.             

सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी म्हणाले, सहकार क्षेत्रासमोर खूप मोठी आवाहने आहेत या सर्व आवाहनांवर मत करुन कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेने प्रगती साधली आहे. १९८७ साली लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. तळागाळातील कष्टकरी जनतेला मदत करत खऱ्या अर्थांने या संस्थेने त्यांना सक्षम केले आहे. ही पतसंस्था सांगलीच्या वैभवात भर घालेल.


Tags: ajit pawarKolhapursangliउपमुख्यमंत्री अजित पवारकर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थाकोल्हापूरमर्या सांगली
Previous Post

गॅसमुळेही होते डोकेदुखी! थांबवण्यासाठी घरच्या घरीच करा हे साधे सोपे घरगुती उपाय…

Next Post

मुंबईनंतर आता भाजपाचं लक्ष्य शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला!

Next Post
BJP Aurangabad

मुंबईनंतर आता भाजपाचं लक्ष्य शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!