मुक्तपीठ टीम
सोनीने Xperia 1 III गेल्या वर्षी लाँच केला. आता त्याच्या अपग्रेडेड वेरिएंट Sony Xperia 1 IVची बातमी आली आहे. सोनी कंपनी लवकरच त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू करणार आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, ३.५ मिमी ऑडिओ जॅक, २४०hz टच सॅम्पलिंग रेट, २४०hz मोशन ब्लर रिडक्शन फीचर, IPX8 वॉटर रेझिस्टंट, IP6X डस्ट रेसिस्टंट, फुल स्टेज स्टीरिओ स्पीकर, डायनॅमिक व्हायब्रेशन सिस्टम, Xperia अडॅप्टिव्ह आहे. या स्मार्टफोनची किंमत १ लाख २३ हजार आहे. त्यात साडे सहा इंचाचा डिस्प्लेही आहे.
मोठा स्क्रिन, रुबाबदार लूक!
- Sony Xperia 1 IVमध्ये ६.५-इंचाचा डिस्प्ले आहे जो 4k HDR OLED 120Hz रिफ्रेश रेटसह आहे
- प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस आहे.
- फोनच्यामागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
- त्याचे तीन कॅमेरे १२ मेगापिक्सलचे आहेत
- त्याचा फ्रंट सेल्फी शूटर १२ मेगापिक्सेलचा आहे.
- या स्मार्टफोनमध्ये Zeiss लेन्सचा वापर करण्यात आला आहे
- या फोनसाठी Zeiss लेन्स पूर्णपणे कस्टमाइझ करण्यात आला आहे.
वेगवान प्रोसेसर!
- या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चा प्रोसेसर आहे.
- हा प्रोसेसर 5G ला सपोर्ट करतो.
- Sony Xperia 1 IV अँड्रॉइड १२ सह येतो.
- यामध्ये १२GB रॅम ऑप्शन मिळेल पण जर इंटरनल स्टोरेजमध्ये २५६GB आणि ५१२GB मध्ये २ पर्याय आहेत.
- हा स्मार्टफोन 1TB पर्यंत एक्सटर्नल मेमरी कार्डला सपोर्ट करतो.
- ५०००एमएएच बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- चार्जिंग, क्यूई वायरलेस चार्जिंग, बॅटरी शेअर फंक्शन, ब्लूटूथ ५.२, गुगल कास्ट, एनएफसी, फिंगरप्रिंट सेन्सर आणि अनेक फिचर्स समाविष्ट आहेत.