अपेक्षा सकपाळ
मराठी सिनेसृष्टीचे अभिनेता हेमंत ढोमे यांनी मुंबई मनपा आणि शिवसेनेचे आभार मानले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. हेमंत ढोमे हे गोरेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विभागातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी विनंती ट्विटरद्वारे त्यांनी मुंबई मनपा आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली होती. दरम्यान आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातलं आणि अवघी मनपा कामाला लागली आणि २४ तासात हा प्रश्न सोडवला गेला.
काय म्हणाले होते हेमंत ढोमे?
“नमस्कार आम्ही ओंकार अनंता संतोष नगर, गोरेगाव पुर्व येथील सर्व रहिवासी पाणी प्रश्नाने अत्यंत त्रस्त आहोत…लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात यावा…सर्व टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मिळावे ही माफक अपेक्षा आहे! अशी विनंती त्यांनी मुंबई मनपाकडे केली.”
@mybmc नमस्कार आम्ही ओंकार अनंता संतोष नगर, गोरेगाव पुर्व येथील सर्व रहिवासी पाणी प्रश्नाने अत्यंत त्रस्त आहोत… लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात यावा… सर्व टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मिळावे ही माफक अपेक्षा आहे! @AUThackeray @IqbalSinghChah2 @KishoriPednekar
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 11, 2022
“बिल्डर आणि महानगरपालिकेच्या वादात प्रामाणिक पणे सर्व नियम पाळणारे, टॅक्स भरणारे सामान्य नागरिक भरडले जात आहेत…तातडीने लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती!”
बिल्डर आणि महानगरपालिकेच्या वादात प्रामाणिक पणे सर्व नियम पाळणारे, टॅक्स भरणारे सामान्य नागरिक भरडले जात आहेत… तातडीने लक्ष द्यावे ही कळकळची विनंती!
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 11, 2022
“यात #watertankerstrike ची भर पडली असून आता पाणीच उपलब्ध नाही आहे…यावर तोडगा काढणं ही मुंबई मनपाची जबाबदारी आहे, असे देखील ते म्हणाले.”
यात #watertankerstrike ची भर पडली असून आता पाणीच उपलब्ध नाही आहे… यावर तोडगा काढणं ही आपली जबाबदारी आहे… @mybmc @prabhu_suneel @GajananKirtikar @AmolGKirtikar
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 11, 2022
या ट्वीटमध्ये त्यांनी सुनील प्रभू, गजानन किर्तीकर आणि अमोल किर्तीकर यांनी टॅग करत विनंती केली आहे.
हेमंत ढोमेंच्या पाणीप्रश्नाची तातडीनं दखल
हेमंत ढोमे यांनी ही विनंती करताच याची दखल आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर आणि मुंबई मनपाने तात्काळ घेतली. २४ तासातच पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला.
“हेमंत ढोमे यांनी मानले मुंबई मनपा आणि शिवसेनेचे आभार!
त्यानंतर हेमंत ढोमे यांनी शिवसेनेचे आणि मुंबई मनपाचे आभार मानले.
आज आम्हा रहिवाश्यांचं एक स्वप्नं तुम्ही पूर्ण केलंत! आम्हाला आमच्या हक्काचं पाणी दिलंत… यापुढेही आपले असेच सहकार्य मिळेल हिच अपेक्षा! खूप खूप धन्यवाद!
– आपला आभारी,
हेमंत ढोमे
आणि
समस्त अनंता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, गोरेगाव (पूर्व) हे ट्वीट करत
#Waterforall #सर्वांसाठीपाणी असे हॅशटॅग ही वापरले.”
आज आम्हा रहिवाश्यांचं एक स्वप्नं तुम्ही पुर्ण केलंत! आम्हाला आमच्या हक्काचं पाणी दिलंत… यापुढेही आपले असेच सहकार्य मिळेल हिच अपेक्षा!
खूप खूप धन्यवाद!
– आपला आभारी,
हेमंत ढोमे
आणि
समस्त अनंता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, गोरेगाव (पूर्व) #Waterforall #सर्वांसाठीपाणी— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 12, 2022
“पुढे ते म्हणाले की, बरोबर २४ तासात आमच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लाऊन आपली कार्यतात्पर्ता सिद्ध केल्या बद्दल मुंबई मनपाचे आभार. तसेच वैयक्तिक लक्ष घालून माझ्या गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सभासदांची आस्थेनं विचारपुस करणाऱ्या मा. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे आभार!”
“तसेच त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे प्रचंड सहकार्य लाभलं आणि या सगळ्यामागे माझ्या सोबत सतत खंबारपणे उभे असलेले युवासेनेचे नेते राहुल कणाल यांचेही विशेष आभार मानले आहे.”
PN ward चे सहा. आयुक्त मकरंद दगडखैर साहेब आणि दिवसभर आमच्यासाठी स्वतः उभे राहुन काम करणारे संतोष संखे साहेब, देशमुख साहेब या सगळ्यांचेही आभार हेमंत ढोमे यांनी मानले आहेत.
सेलिब्रिटींची घेता तशी सामान्यांचीही दखल घ्या!
हेमंत ढोमेंसारख्या सेलिब्रिटींची जशी तत्परतेने दखल घेतली जाते तशीच तत्परतेने दखल सामान्य माणसांच्या समस्यांचीही घ्या, अशी प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त झाली आहे. त्यांचाही तुम्हाला दुआ लागेल, असेही सुनावण्यात आलं आहे.
सर्व सामान्यांचे प्रश्न सुद्धा असेच सुटले असते तर किती बरं झालं असतं ना- मनसे
सर्व सामान्यांचे प्रश्न सुद्धा असेच सुटले असते तर किती बरं झालं असतं ना…त्यांनीही अशीच कौतुकाची थाप मारली असती. https://t.co/zUiOQ3prNc
— MNS Report | मनसे रिपोर्ट (@mnsreport9) May 12, 2022