मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असून याप्रकरणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
राज ठाकरेंना धमकीचं पत्र…
- मला एक धमकीचं पत्र आलं आहे.
- भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे.
- पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
- मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो.
- पत्राची प्रत त्यांना दिली आहे.
- पोलीस काय कारवाई करतात ते पाहू
- अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु.
- तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू.
- हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
…तर महाराष्ट्र पेटून उठेल!!
- पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही.
- पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे.
- गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.
- पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे, पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी.
- मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे.
- राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी