मुक्तपीठ टीम
कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस पी. रवींद्रनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहित गंभीर आरोप केला आहे. बनावट जात प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे आपल्याला त्रास दिल्याचे सांगितले. अशाप्रकारे ज्येष्ठ आयपीएसचा राजीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे.
पी. रवींद्रनाथ यांचा तडकाफडकी राजीनामा…
- रविंद्रनाथ यांच्याकडे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक हे पद होते.
- त्यांची नुकतीच प्रशिक्षण महासंचालक या पदावर बदली करण्यात आली होती.
- बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळेच आपली कोणत्याही ठोस कारणाशिवाय बदली करण्यात आल्याचा आरोप रविंद्रनाथ यांनी केला आहे.
- यापूर्वीही त्यांनी वरिष्ठांकडून छळ करून पदोन्नतीत डावलले जात असल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता.
नेमकं प्रकरण काय?
- कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस पी रवींद्रनाथ यांची वारंवार बदली केली जात होती.
- यामुळे व्यथित होऊन त्यांनी मंगळवारी (१० मे) आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, ‘कोणतेही कारण नसताना माझी वारंवार बदली करण्यात आली.
- हा केवळ माझा छळ करण्याचा मार्ग होता, कारण मी बनावट जात प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली होती.
यासाठी मला बक्षीस मिळाले.