थोडक्यात महत्त्वाच्या : 1)दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असतानाच आता ग्रहकांना घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा मार सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करीत २७० वरून थेट ४० रुपयांपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे येत्या काळात अनुदानच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. 2) नायर रुग्णालयाच्या आवारातील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी भीमसंदेश तुपे याने सोमवारी रात्री आत्महत्या केली. भूलशास्त्राच्या पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या तुपेने भूल देण्यासाठी उपयोग होणाऱ्या दोन इंजेक्शनचे मिश्रण जास्त प्रमाणात टोचून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 3) अनधिकृत इमारतीवर कारवाईची धार तीव्र करणाऱ्या महापालिकेकडूनच वीजचोरी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेने बाजूच्या दुकानातून वीजचोरी केल्याची तक्रार दुकानदाराने केली असून या तक्रारीची दाखल घेत महावितरणने या अनधिकृत कनेक्शनवर कारवाई करत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 4) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. २९ एप्रिल ते २० मे २०२१ या काळात दहावी बोर्डाची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाऊ शकते. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. 5)पिंपरी चिंचवडचा प्रख्यात गुंड गजानन मार्नेला दोन लोकांच्या हत्ये प्रकरणी मुंबईतील तळोजा कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. गजाननच्या सुटकेची माहिती मिळताच त्यांच्या ३०० समर्थक ५० गाड्यांच्या ताफ्यासह तळोजा जेलबाहेर पोहचले व बाहेर येताच त्याचे पुष्पवर्षाव करत स्वागत करत एक रोड शो काढण्यात आला.