मुक्तपीठ टीम
“बस हो गई महंगाई की मार, अब की मार मोदी सरकार!” या घोषणेसह सत्तेत आलेल्या मोदी सरकारचं दुसरं पर्व हे महागाई भडकवणारं ठरलं असल्याचं दिसत आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर गेल्या तीन वर्षात तब्बल २९० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. या ३६ महिन्यांमध्ये अपवाद वगळला गॅस सिलिंडरची महागाई ही भडकतीच राहिली आहे. अपवादही घडले ते प्रामुख्याने निवडणुकीच्या कालावधीतच! त्यामुळे आता “दुसरी बार मोदी सरकार, बढ गई महंगाई की मार!” अशी चर्चा सुरु झाली आहे.
मेच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत १०९ रुपयांनी वाढल्यानंतर आपल्याला काय त्याचं असं वाटणाऱ्यांना आज चांगलाच धक्का बसला. घरातील स्वयंपाक करणं आता महाग झाले आहे. १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. आता मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९९९ रुपये ५० पैसे झाली आहे. यापूर्वी २२ मार्च रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग होण्याचाही आपल्याला फटका!
मार्चमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर १ एप्रिल रोजी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्या दिवशी त्याची किंमत २४९ रुपये ५० पैसे प्रति सिलिंडरने वाढवली होती. यानंतर मुंबईत या सिलिंडरची किंमत २२५३ रुपयांवर गेली होती. यानंतर १ मे २०२२ रोजी व्यावसायिक एलपीसी गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर १०४ रुपयांनी वाढ करण्यात आली. खरंतर या सिलिंडरच्या किंमत वाढीचाही फटका तुम्हाला आम्हाला बसतो. कारण ते महागल्यानंतर हॉटेल, खानावळी, रस्त्यावरील अन्नपदार्थ विकणारे फेरीवाल्यांनीही आपल्या पदार्थांचे भाव वाढवतात. त्यामुळे केवळ घरातील गॅस वाढीचा आपल्याला फटका बसत नाही तर आपण थेट वापरत नसलो तरी व्यावसायिक गॅस सिलिंडरची महागाईही तेवढाच फटका बसतो. त्यामुळे “दुसरी बार मोदी सरकार, डबल हो गई महंगाई की मार!” असंच दिसत आहे.
कसे महागत आहेत घरगुती गॅस सिलिंडर…जून २०१९ ते मे २०२२
- May 7, 2022 999.50
- March 22, 2022 949.50
- October 6, 2021 899.50
- September 1, 2021 884.50
- August 17, 2021 859.50 875.50
- July 1, 2021 834.50
- June 1, 2021 809.00
- May 1, 2021 809
- April 1, 2021 809
- March 1, 2021 819
- February 25, 2021 794
- February 15, 2021 769
- February 4, 2021 719
- January 1, 2021 694
- December 15, 2020 694
- December 2, 2020 644
- November 1, 2020 594
- October 1, 2020 594
- September 1, 2020 594
- August 1, 2020 594
- July 1, 2020 594
- June 1, 2020 590.5
- May 1, 2020 579
- April 1, 2020 714.5
- March 1, 2020 776.5
- February 12, 2020 829.5
- January 1, 2020 684.5
- December 1, 2019 665
- November 1, 2019 651
- October 1, 2019 574.5
- September 1, 2019 562
- August 1, 2019 590.5
- July 1, 2019 608.5
- June 1, 2019 709.5
- May 1, 2019 684.5
- April 1, 2019 678.5
- March 1, 2019 673.5 आकडेवारी संदर्भ – इंडियन ऑइल