Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता काशीच्या ज्ञानव्यापी मशिदीचा वाद! न्यायालयाचा सर्वेक्षण आदेशामुळे ओवेसींना आठवला अयोध्या संघर्ष!

May 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Asaduddin Owaisi

मुक्तपीठ टीम

अयोध्येत राम मंदिर साकारले जात असतानाच आता काशीमधील ज्ञानव्यापी मशिदीचा वाद पेटला आहे. दिल्लीतील तिघांच्या याचिकेनुसार न्यायालयाने या मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्या आदेशावर टीका करत एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा नव्वदच्या दशकातील अयोध्या रथयात्रा संघर्षासारखी स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या मेते तो आदेश १९९१च्या धार्मिक स्थळांना जसं आहे तसं ठेवण्याच्या कायद्याचंही उल्लंघन आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालात असे म्हटले होते की, हा कायदा भारतीय राजकारणाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांचे संरक्षण करतो जे संविधानाच्या मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे.”असदुद्दीन ओवेसी यांचे विधान न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी केल्याच्या एका दिवसानंतर आले.

ज्ञानव्यापी मशीद प्रकरण

दिल्लीस्थित राखी सिंह, लक्ष्मी देवी, सीता साहू आणि इतरांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या शृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान आणि नंदी येथे दैनंदिन पूजा आणि विधी करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती.
१८ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी आपल्या याचिकेसह न्यायालयात धाव घेतली होती.

याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर, वाराणसी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयाने काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद संकुलातील शृंगार गौरी मंदिर आणि ईद नंतर आणि १० मे पूर्वी व्हिडीओग्राफी करण्याचे आदेश दिले.
६ मे आणि ७ मे रोजी मशिदीच्या आवारात व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षण होणार होते.

शृंगार गौरी मंदिराच्या संरचनेच्या प्रत्येक विटेचे सर्वेक्षण…

  • दुपारी तीन वाजता, काशी विश्वनाथ धाम संकुलातील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात एकच गोंधळ उडाला, जेव्हा न्यायालयाचे आयुक्त आणि त्यांचे वकील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षकार मशिदीच्या पश्चिमेला पोहोचले आणि मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.
  • मुख्य दरवाजातून भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला होता.
  • आधीच उपस्थित असलेले विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी डॉ. सुनील कुमार वर्मा आणि डीएमचे प्रतिनिधी म्हणून आलेले एडीएम सिटी गुलाब चंद्रा यांनी सर्वेक्षण सुरू केले.
  • कोर्ट कमिशनरने दोन सहकारी वकिलांसह सर्वेक्षण सुरू केले, जे सुमारे तीन तास सुरू होते.
  • आयोगाच्या कामकाजादरम्यान गेटबाहेर मोठा गोंधळ झाला.
  • दोन्ही बाजूंच्या लोकांचा जमाव जमला होता.

Tags: Asaduddin OwaisiAyodhya ConflictCourt CommissionerCourt SurveykashiKashi Vishwanath DhamMasjid Disputemuktpeethअयोध्या संघर्षअसदुद्दीन ओवेसीकाशीकाशी विश्वनाथ धामकोर्ट कमिशनरज्ञानव्यापी मशीद प्रकरणन्यायालय सर्वेक्षणमशिदीचा वादमुक्तपीठ
Previous Post

धावपटू अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम! १३.२५ मिनिटांमध्ये कापलं ५ हजार मीटर अंतर!

Next Post

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण: २५% विवाहांमध्ये वधू अल्पवयीन! गर्भनिरोधकांचा वापर वाढला!

Next Post
NFHS

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण: २५% विवाहांमध्ये वधू अल्पवयीन! गर्भनिरोधकांचा वापर वाढला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!