मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलचं तापले आहे. सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता. तसेच राज्य सरकारलाही मशिदींवर भोंगे उतरवण्यावर ३ मे पर्यंतचा अल्टमिमेटम दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघणी केली आहे. महाराष्ट्रात काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही. तसेच राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही!
- महाराष्ट्रात काम करत असताना कोणीही असं अल्टिमेटम देऊ शकत नाही.
- हे कायद्याचं राज्य आहे.
- इथे कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही.
- जर कोणाला असं वाटत असेल की मी असं म्हटलं तर तसं होईल तर ते चालणार नाही.
- मग अजित पवारनेही हुकुमशाही केलेली चालणार नाही.
- कायद्याने, संविधानाने, नियमाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं पालन सर्वांनाच करावं लागेल.
- सर्व पक्षाच्या नेत्यांना नागरिकांना, ग्रामस्थांना करावा लागेल.
राज ठाकरेंची लोकसभा निवडणुकीच्या आधीची भाषणं भाजपाच्या विरोधात!
- राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात यावर त्यांचा सूर अवलंबून असतो.
- लोकसभा निवडणुकीच्या आधी जी भाषणं झाली ती भाजपाच्या विरोधात होती.
- नंतरच्या काळात अशा काही गोष्टी घडल्या आणि त्यांचं मन व मतपरिवर्तन झालं.
- त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, आघाडी, महाविकास आघाडी, शिवसेना यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.