मुक्तपीठ टीम
गुगल हा सध्याच्या डिजिटल क्षेत्रात जबरदस्त कामगिरी बजावत आहे. गुगलने मागील काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन लाँच केला होता. तर आता गुगल पिक्सेल वॉचची चर्चा रंगली आहे. गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी आधीच सूचित केले आहे की, गुगल आय/ओ २०२२ इव्हेंटमध्ये पहिले गुगल स्मार्टवॉच लाँच करण्याची शक्यता आहे. हा गुगल इव्हेंट ११ आणि १२ मे रोजी होणार आहे. गुगल वॉचची लाँच तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे त्याचे फिचर्स समोर येत आहेत. गुगलने अद्याप अधिकृतपणे आपल्या फीचर्सची माहिती दिलेली नाही.
पिक्सेल स्मार्टवॉचची रचना
- गुगल स्मार्टवॉच फिचर्समध्ये त्याची डायल गोल आणि प्रोप्रायटरी स्ट्रिप्स आहेत.
- बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये ३०० एमएएचची बॅटरी मिळू शकते आणि ती सेल्युलर कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये येऊ शकते.
स्मार्टवॉच तीन मॉडेलमध्ये येण्याची शक्यता
- वेबसाइटने गुगल पिक्सल वॉच GWT9R, GBZ4S आणि GQF4C या मॉडेल क्रमांकांसह तीन मॉडेलमध्ये लिस्ट केले आहे.
- यामध्ये ब्लूटूथ व्ही५.२ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
- स्मार्टवॉचचे नवीन व्हर्जन RWD7 ऐवजी RWD5.211104.001 या सॉफ्टवेअर व्हर्जन क्रमांकासह लिस्ट केले आहे.
पाहा व्हिडीओ: