मुक्तपीठ टीम
१ मे हा दिवस राजकीयदृष्ट्या चांगलाच गाजला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या सभेच्या टायमिंगची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला. यातून संगनमत आहे हे सिद्ध होत आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.
फडणवीस आणि राज ठाकरेंचं संगनमत!
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
- मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील भाषण संपले आणि त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादमधील स्टेजवर भाषणासाठी मंचावर चढले.
- फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला.
- यातून संगनमत आहे हे सिद्ध होतेय, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
- राष्ट्रवादी आणि खासकरुन शरद पवार यांच्यावर बोलले तरच कव्हरेज मिळते.
- त्यामुळे राज ठाकरे सतत शरद पवार यांच्यावर बोलत आहेत.
जबरदस्त टायमिंग! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औरंगाबादेत सभास्थानी आगमन,
विप नेते देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाषण संपलं.— Tulsidas V. Bhoite 🌸 (@TulsidasBhoite) May 1, 2022
राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाची!
- राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणात मला काहीच दम वाटला नाही.
- भाषणात नवीन काहीच मुद्दे नव्हते.
- मागील सभेत जे मुद्दे मांडले गेले तेच मुद्दे या भाषणात होते.
- त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे.
- महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या.
- पण राज साहेबांनी महागाईवर पण बोलावे.
- पण ते बोलत नसल्याने राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाने लिहून दिलीय असे दिसतेय.
राज ठाकरेंची दबावामुळे शरद पवारांवर टीका!
- शरद पवारांचा द्वेष करा, त्यांच्याविरोधात बोला, अशी स्क्रिप्ट राज ठाकरे यांना कुणीतरी दिली आहे.
- ती स्क्रिप्ट वाचण्याचा दबाव राज ठाकरेंवर दिसतोय आणि त्यामुळे ते काही कारणामुळे नाईलाजास्तव शरद पवारांवर टीका करत आहेत.
- त्यामुळे भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था दिसली.
- शरद पवार यांच्याविरोधात जितके जास्त बोलता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विष कालवून धर्माधर्मात तेढ निर्माण करुन समाजात विष कसे पसरवता येईल यासाठी जितके जास्त कसे चिथावणीखोर बोलता येईल तसा प्रयत्न राज ठाकरेंच्या भाषणातून दिसत होता.
नेमकं काय घडलं?
- रविवारी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित जाहीर सभा पार पडली.
- तर मुंबईत देवेंद्र फडणवीसांची बुस्टर डोस सभा होती.
- या दोघांच्या सभा येत्या मनपा निवडणुकांसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या.
- राज ठाकरे साडेसात वाजता या सभेला पोहोचणार होते. मात्र, राज ठाकरे ७ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास मैदानात पोहोचले आणि ८ वाजून ३ मिनिटांनी राज ठाकरे भाषणासाठी उभे झाले.
- राज ठाकरेंचे औरंगाबादमधील मैदानात आगमन झाले आणि मुंबईतील बुस्टर सभेतील देवेंद्र फडणवीसांचे भाषण संपले होते.
- त्यामुळे राजकीय वर्तुळात फडणवीस आणि राज ठाकरेंच्या या टायमिंगची चर्चा रंगली आहे.