मुक्तपीठ टीम
नांदेड शहरात ‘स्वतंत्र मराठवाडा’ या वर्तमानपत्राच्या संपादकांची भर रस्त्यावरच हत्या करण्यात आली आहे. संपादक प्रेमानंद जोंधळे यांची हत्या त्यांच्याच भागातील एका तरुणाने केल्याने खळबळ माजली आहे टिव्हीचा आवाज कमी करण्याबाबत सांगण्यावरून राग आल्याने घरासमोरच राहणाऱ्या कृष्णा हातांगळे याने शनिवारी रात्री चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या निर्घृण हत्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
नेमकं प्रकरण काय?
- सोमेश कॉलनी भागात संपादक प्रेमानंद जोंधळे राहतात.
- त्ंयाच्या घरासमोरच राहणारा आरोपी कृष्णा हातांगळे हा टीव्हीचा आवाज मोठा करत असल्याने त्याला आवाज कमी करण्याबाबत प्रेमानंद हे सतत सांगायचे.
- परंतु मला सतत आवाज कमी करण्यास सांगतो, याचा राग मनात धरून आरोपीने रात्री मिल रोड भागात गाठून प्रेमानंद जोंधळेच्या पोटात चाकूने भोसकून खून केला.
- घटनास्थळावरून आरोपी पसार झाला.
- ही माहिती मिळताच वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
- प्रेमानंद जोंधळेंना शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले.
- परंतु अति रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नांदेड शहरात गुन्हेगारी वाढली आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.