Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कामगार दिन: समजून घ्या संघर्षाचा इतिहास…

May 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
labour

मुक्तपीठ टीम

१ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातोय, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिनही याच दिवशी साजरा केला जातो. याचा इतिहासही खूप रंजक आहे. दरवर्षी १ मे हा दिवस कामगार आणि कामगारांना आदर देण्याच्या उद्देशाने त्यांना समर्पित केला जातो. कामगार दिन हा केवळ कामगारांना सन्मान देण्यासाठी नाही तर या दिवशी कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला जातो. जेणेकरून त्यांना समान अधिकार मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहे कामगार दिनाचा इतिहास.

कामगार दिनाचा इतिहास

  • कामगार दिनाचा इतिहास पॅरिस आणि अमेरिकेतून सुरू झाला.
  • १ मे १८८६ रोजी अमेरिकेत कामगारांनी संपही पुकारला होता.
  • या आंदोलनात अमेरिकेतील कामगार रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला सुरुवात केली होती.
  • कामगारांना दिवसातून १५-१५ तास काम करावे लागत असल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
  • आंदोलनादरम्यान पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला आणि अनेक कामगारांनी प्राण गमवावे लागले.
  • तर १०० हून अधिक कामगार जखमी झाले.
  • त्यानंतर १८८९ मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय मार्क्सवादी समाजवादी काँग्रेसने कामांचे तास ८ तास असावे अशी मागणी केली होती.
  • या मागणीमुळे कामगार दिनाला आंतरराष्ट्रीय रुप प्राप्त झाले.
  • या परिषदेतच १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
  • यासोबतच दरवर्षी १ मे रोजी सुट्टी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
  • अमेरिकेत आठ तास काम करणाऱ्या कामगारांच्या नियमानंतर अनेक देशांमध्ये हा नियम लागू करण्यात आला.

भारतात सुरुवात कधी झाली?

  • अमेरिकेत १ मे १८८९ रोजी कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव आला असला तरी.
  • भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. याचवेळी भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला.
  • कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

कामगार दिनाचा उद्देश काय?

  • दरवर्षी १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचा उद्देश कामगार आणि कामगारांच्या कामगिरीचा सन्मान करणे आणि योगदानाचे स्मरण करणे हा आहे.
  • यासोबतच कामगारांच्या हक्क व हक्कासाठी आवाज उठवणे आणि शोषण थांबवणे.
  • या दिवशी अनेक संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना एक दिवस सुट्टी दिली जाते.

Tags: IndiaInternational Labour Dayअमेरिकाजागतिक कामगार दिनभारत
Previous Post

आमचा अस्वस्थपणा,आज आम्ही शांततेने व्यक्त केला……

Next Post

देशात अभूतपूर्व वीज टंचाई! महाराष्ट्र, गुजरात, यूपीसह नऊ राज्यांमध्ये संकट!!

Next Post
nine states are facing power crisis due to coal

देशात अभूतपूर्व वीज टंचाई! महाराष्ट्र, गुजरात, यूपीसह नऊ राज्यांमध्ये संकट!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!