Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर राज ठाकरेंची सभा होणारच! पण…

April 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या औरंगाबादमधील जाहीर सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे, अशा बातम्या सर्वच माध्यमांमध्ये सुत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. मनसे नेते आणि औरंगाबाद पोलीस आयुक्तांमध्ये झालेल्या बैठकीत या सभेला अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याचे जाहीर केल्यावर या सभेला परवानगी देणं टाळण्यात येत होतं. आता औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळाली आहे, असं सांगण्यात येत आहे. पण त्यासाठी मनसेला काही नियम-अटी-शर्थीचं पालन करावं लागणार आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी ‘या’ अटी-शर्थी :

  • ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.
  • लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी.
  • इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  • सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.
  • १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.
  • व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये.
  • वाहन पार्किंगचे नियम पाळावे.
  • सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
  • सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.
  • सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.

दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झाले. १ मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात यासाठी संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणीसुद्धा केली. तसेच, औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.


Tags: AurangabadmnsRaj Thackerayऔरंगाबादमनसेराज ठाकरे
Previous Post

बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

Next Post

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची मदत!

Next Post
Memoradun between infosys And SCERT

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची मदत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!