मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेट दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच दरम्यान राज ठाकरे यांच्या नव्या ट्वीटची सर्वत्र चर्चा होत आहे. या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केले आहे. उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी अनेक धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले त्यामुळे राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं असून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. आता त्यांच्या ट्वीटवर वाद सुरु झाला आहे. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना भाजपाच्या इतर काही धोरणांबद्दल प्रश्न विचारले आहेत, तर ट्विटरवर काहींनी उत्तरप्रदेशात अजानच्यावेळी हनुमान चालिसा पठण केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या पुजाऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
नेमकं काय आहे राज ठाकरेंच्या ट्वीटमध्ये?
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. राज ठाकरेंनी हे ट्वीट टाकताना #Azaan आणि #Loudspeakers हे दोन हॅशटॅग दिले आहेत. सोबतच अभिनंदनाचं पत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ट्वीट केलं आहे.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
राज ठाकरेंच्या ट्वीटवर शिवसेनेची प्रतिक्रिया-
शिवसेनेचे अरंविद सांवत यांनी या ट्वीटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भोंगे उतरवलेले नाहीत हे अर्धवट उत्तर देऊ नका. मूळ मुद्दा आवाज वाढतो. शिवतीर्थावरील सभेवरचा तर त्या सभेचा डेसीबल कमी करणे अशाबद्दलचा आहे. मुळात असं आहे की, असं जे धोरण भारतीय जनता पक्षाला योग्य वाटतं का? ते राज्य न्याय कशासाठी करता. तुम्ही गोहत्या देशभर बंद केली. पण तरीसुद्धा तुम्ही गोव्यात परवनागी दिली की. मनोहर पर्रिकर सरळ तोंडावर बोलले होते की हे मला जमणार नाही. जसा गोबंदीचा कायदा केला तसा हा कायदा करा कशाला राज्याराज्यांमध्ये आग लावण्याचं काम करत आहेत. एकदाच कायदा करा केंद्राच्या पातळीवर म्हणजे प्रश्नचं सुटून जाईल. करायचं नाही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारत बसून राहायचं. तर त्याच्याजागी हे जर केलं तर प्रश्न मिटून जाईल. ते करायचं नाही इतर राज्यामध्ये मग ते गुजरातमध्ये का नाही केलं? तुमच्या मध्यप्रदेशा का नाही झालं. योगींसारखं कोणी गुजरातमध्येही नाही. कशाची कोणाशी तुलना करतात. हाथरससारख्या प्रकरणात योंगीसारखं ही कोणी झालं नाही. सरड्यासारखी रंग बदलणारी माणसं असं बोलतात ना तेव्हा मला कमाल वाटते. म्हणून कोणी बोलतय त्यांना बोलू द्यायचं आम्हाला कामामध्ये जास्त स्वारस्य आहे.
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून भोग्यांवर कारवाई केली जात आहे. विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत. काही ठिकाणी परवानगी नसलेले भोंगे उतरवण्यात आली आहे. तर जिथे परवानगी घेतली आहे तिथे आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशातील हनुमान चालिसा पठणविरोधी कारवाईचं काय?
राज ठाकरेंचं ट्वीट येताच ट्विटरवर काहींनी त्यांना प्रश्न विचारण्यासही सुरुवात केली आहे. योगेश सावंत यांनी राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशातील पुजाऱ्यावर हनुमानचालिसा पठणानंतर दाखल गुन्ह्याचं काय असा प्रश्न विचारला आहे.
राज साहेब भोंगे काढले पुजाऱ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच काय ?@RajThackeray https://t.co/1l0aqeTzWU
— yogesh sawant (@yogi_9696) April 28, 2022