मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी सांगितले की, या बैठकीत लसीकरण आणि रुग्णसंख्येवर चर्चा झाली. महाराष्ट्रात सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता करण्याची गरज नसली तरी गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्तीचा विचार करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
काय म्हणाले राजेश टोपे?
- पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
- राज्यात सध्या २५ हजारापर्यंत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
- महाराष्ट्रात सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता करण्याची गरज नाही.
- कोरोना वाढत असल्याने चाचण्या पुन्हा वाढणार.
- नवे व्हेरियंट सुद्धा ओमायक्रॉनचाच भाग.
- ६ ते १२ वर्षाप.र्यंत लहान मुलांचं लसीकरण वाढवावं लागेल.
- गर्दीच्या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रात मास्कसक्ती करण्याचा विचार.
- मुख्यमंत्री आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकतात