मुक्तपीठ टीम
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विर्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ मधील अर्ज ऑनलाईन सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल (http://mahadbt.gov.in) दि. १४ डिसेंबर २०२१पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.30 एप्रिल असणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या स्विकृती (New/Renewal) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. ३० एप्रिल, २०२२ अशी आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ (Re-apply) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० एप्रिल, २०२२ अशी आहे. तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरिता (Renewal) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. ३० एप्रिल, २०२२ अशी आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तत्काळ भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.