मुक्तपीठ टीम
सध्याचा काळ हा स्मार्टकाळ. स्मार्टजीवन जगण्यासाठी स्मार्टफोनही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्ही स्वस्त स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी आहे. देशांतर्गत कंपनी असलेल्या मायक्रोमॅक्सने आपला नवीन बजेट स्मार्टफोन मायक्रोमॅक्स इन २सी लॉंच केला आहे. मायक्रोमॅक्सच्या मायक्रोमॅक्स इन २सी मध्ये फेस अनलॉक आणि ड्युअल रियर कॅमेरा सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या फोनमध्ये ६.५२ इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.
मायक्रोमॅक्स इन २सीचे खास फिचर्स
- याच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, मायक्रोमॅक्स इन २सीमध्ये ६.५३ इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे.
- डिस्प्लेची शैली वॉटर ड्रॉप आहे. डिस्प्ले टच जलद आहे.
- यामध्ये अॅंड्रॉईड ११ देण्यात आले आहे, जो अॅंड्रॉईड स्टॉक आहे म्हणजेच फोनमध्ये अनावश्यक थर्ड पार्टी अॅप्स मिळणार नाहीत.
- शाओमी ते सॅमसंग आणि रिअॅलिटीमधील फोनमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा स्टॉक अॅंड्रॉईड मिळणार नाही.
- फोनमध्ये ३ जीबी रॅमसह ३२ जीबी स्टोरेज आहे, जरी मेमरी कार्डच्या मदतीने ते २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता.
- मेमरी कार्डसाठी वेगळा स्लॉटही मिळेल. फोनमध्ये यूएनआयएसओसी टी६१० प्रोसेसर उपलब्ध आहे, जो ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
- यापूर्वी हा प्रोसेसर इनफिनिक्स हॉट ११ २०२२ आणि रिअलमीच्या सी२५वाय व्यतिरिक्त नोकियाच्या एंट्री लेव्हल फोनमध्ये दिसला आहे.
मायक्रोमॅक्स इन २सी कॅमेरा फिचर्स
- कॅमेरा बद्दल सांगायचे तर, या मायक्रोमॅक्स फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी लेंस ८ मेगापिक्सेल आहे आणि दुसरी लेन्स पोर्ट्रेटसाठी आहे.
- तसेच कंपनीने दुसऱ्या लेन्सच्या मेगापिक्सलबद्दल माहिती दिलेली नाही. समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
- पोर्ट्रेट, ब्युटी, एआय, नाईट, क्यूआर कोड स्कॅनर आणि स्लो मोशन असे अनेक मोड कॅमेरासोबत उपलब्ध असतील.
मायक्रोमॅक्स इन २सी बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी फिचर्स
- बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, यात १० वॅट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएच बॅटरी आहे.
- सुमारे अडीच तासांत बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
- कनेक्टिव्हिटीसाठी फोन वायफाय, २जी, ३जी आणि ४जीला सपोर्ट करतो.
- फोनमध्ये सिंगल स्पीकर, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. फोनचे एकूण वजन १९८ ग्रॅम आहे.
मायक्रोमॅक्स इन २सीची किंमत
मायक्रोमॅक्स इन २सीची किंमत ७ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे, ही लाँचिंग किंमत आहे. नंतर त्याची किंमत ८ हजार ४९९ रुपये असेल. मायक्रोमॅक्स इन २सीची पहिली विक्री १ मे २०२२ रोजी होईल, जरी कंपनीने या क्षणी विक्री कोणत्या प्लॅटफॉर्मवर होईल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
पाहा व्हिडीओ: