मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मुख्य अभियंता या पदासाठी ०७ जागा, उप मुख्य अभियंता या पदासाठी ११ जागा, अधिक्षक अभियंता या पदासाठी २३ जागा अशा एकूण ४१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) १५ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) १४ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कं. लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahagenco.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ :