मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी पार पडणार होती. ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची सुनावणी आता 4 मे रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसी’ आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा पारित या निवडणुकांचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडून काढून घेत स्वत:कडे घेतले आहेत. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे राज्यातील १८ पालिका निवडणुका प्रलंबित आहेत. परंतु याविरोधात एकूण ७ याचिका करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर एकाच दिवशी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र ती टळली आहे.
या सुनावणीस आहे विशेष महत्व…
- सर्वोच्च न्यायालयात राहुल वाघ यांच्यासह महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील १३ जणांच्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात येत आहे.
- सर्वोच्च् न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘ओबीसी’ आरक्षणाला फटका बसल्याने राज्य सरकारने निवडणूक कायद्यात दुरुस्ती करून प्रभागरचना करण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत.
- त्यामुळे या सुनावणीस महत्त्व प्राप्त झालं आहे.
- राज्य निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला प्रभाग रचना करण्याबाबतचे सुधारित आदेश पाठवले आहेत.
- या आदेशांच्या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मुदत मागितली होती.
ओबीसी आरक्षणाबद्दलचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला!
- ओबीसी आरक्षणासंदर्भात अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.
- राज्य मागासवर्ग आयोगाने हा अहवाल तयार केला होता परंतु काही त्रुटी आढळल्यामुळे अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे.
- अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची योग्या आकडेवारी दिली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
- तसेच पुढील आदेशापर्यंत निवडणूक घेऊ नये असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
- यामुळे निवडणुका रखडल्या आहेत.