मुक्तपीठ टीम
बँक ऑफ इंडियात नियमित ऑफिसर या पदावर ५९४ जागा तर, कंत्राटी ऑफिसर या पदासाठी १०२ जागा अशा एकूण ६९६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- अर्थशास्त्र / अर्थमिती/ सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी + ०४ वर्षे अनुभव किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीआयएसए + ०३ वर्षे अनुभव किंवा फायनान्स एमबीए/ फायनान्स पीजीडीएम/ सीए/ आयसीडब्ल्यूए + १० वर्षे अनुभव किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम/ पीजीबीएम/ पीजीडीबीए किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएस किंवा इंजिनिअरिंग पदवी + ०३ वर्षे अनुभव किंवा ६०% गुणांसह बीई/ बी.टेक + ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) बी.ई./ बी.टेक./ एमसीए २) ७ ते ८ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://bankofindia.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.