Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण

राज्य शासनाचा पिडीलाईट इंडस्ट्रीजशी सामंजस्य करार

April 22, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
pidilite

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना आता पिडीलाईट इंडस्ट्रीजच्यावतीने आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

            

राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी, आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

            

कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या मंत्रालयातील दालनात आज कराराबाबत सविस्तर चर्चा झाली. पिडीलाईट इंडस्ट्रीजचे अरुण उपाध्याय यांनी सविस्तर सादरीकरण करुन पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मैसन आणि इंटेरियर डेकोरेशन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची खूप मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

            

यावर पिडीलाईट इंडस्ट्रीजने औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करावे. राज्यातील काही औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण द्यावे. त्यानंतर व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येण्यासाठी प्रयत्न करावे, असे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

            

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी भविष्यातील मनुष्यबळ आहे. त्यांना आताच योग्य प्रशिक्षण दिल्यास भविष्यात त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचे परिणाम देऊ शकतील. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री राजेश टोपे यांनी केले.

            

हे सर्व प्रशिक्षण उपक्रम पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रम मधून केले जाणार आहे. पिडीलाईट इंडस्ट्रीजने यापूर्वी गुजरात आणि राजस्थान सरकार सोबत सामंजस्य करार केले आहेत. कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांनी सांगितले.

            

प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी महाराष्ट्र शासन आणि पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण मिळेल, असे सांगितले.

            

यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक योगेश पाटील, पिडीलाईट इंडस्ट्रीजचे संजीव सिन्हा, डॉ. प्रदीप गाडेकर, हर्षद देशपांडे, अरुण चमणकर, हिना शहा आदी उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Good news MorningITIPidiliteRajesh Topeआयटीआयकौशल्य विकास मंत्री राजेश टोपेपिडीलाईट इंडस्ट्री
Previous Post

‘पुष्पा’च्या अल्लू अर्जुनची अस्सल नायकगिरी, कोट्यवधीची पानमसाला जाहिरात नाकारली!

Next Post

ब्लूटूथ वाय-कनेक्ट अॅपला सपोर्ट, यामाहाची नवीन 2022 Yamaha MT-15 V2.0 लाँच

Next Post
2022 Yamaha MT-15 V2.0

ब्लूटूथ वाय-कनेक्ट अॅपला सपोर्ट, यामाहाची नवीन 2022 Yamaha MT-15 V2.0 लाँच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!