Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेंढपाळांना पशुधन विमा योजना सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय – दत्तात्रय भरणे

April 21, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठक 1

मुक्तपीठ टीम 

मेंढपाळांचा मेंढी चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे तसेच मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करणे. तसेच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक योजना या राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

            

मंत्रालयातील दालनात मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासचे सहसचिव माणिक गुट्टे, अवर सचिव विकास कदम, उपायुक्त डॉ.शैलेशे पेठे, विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंच अमरावतीचे संस्थापक संतोष महात्मे, जानराव कोकरे, नितीन कानडे, नंदकुमार गांजे, अर्जुन थोरात, राहुल हजारे, अंकुश मुंढे, चंद्रकांत हुलगे, बापू पुजारी, हरिभाऊ शिंदे, शरद शिंदे, म्हस्कू कारंडे, गोमा काकडे, पांडुरंग कावळे यावेळी या बैठकीला उपस्थित होते.

              

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मेंढपाळ आणि वन विभागाच्या संघर्षाच्या तक्रारी वारंवार येत आहेत. हे लक्षात घेता वन विभागाकडून मेंढपाळांवर वन क्षेत्रात चराई करण्याकरिता शासनाच्या आदेशान्वये बंदी आहे तरी शासनाकडून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे, कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळांना शेडचे बांधकाम व मोकळ्या जागी पिण्याचे पाणी, चारा, बियाणे, बहुवार्षिक गवत प्रजातीचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत  योजना प्रस्तावित कराव्यात अशा सूचना यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिल्या.

मेंढपाळांना देण्यात येणाऱ्या पशुधन विम्याचे कार्यक्षेत्र वाढविणार            

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मेंढपाळाना देण्यात येणाऱ्या पशुधनविमा योजनांचे कार्यक्षेत्र वाढविण्याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून मेंढपाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व्हावी यासाठी लवकरच विभागस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी  विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या राज्यात ७३ तालुक्यात फिरते पशु चिकीत्सालय आहेत लवकरच ८० तालुक्यात ही सुविधा वाढविण्याचा शासनाचा विचार आहे. फिरते पशु चिकीत्सालयाकरिता १९६२ हा टोल फ्री क्रमांक आहे त्याचा लाभ मेंढीपाळांनी घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मेंढपाळांना मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन मेंढपाळांकडून आलेल्या सूचनांवर कार्यवाही करेल, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

           

विदर्भ मेंढपाळ, धनगर विकास मंच, अमरावतीचे संस्थापक संतोष महात्मे यांनी मेंढपाळांचे विविध प्रश्न यावेळी बैठकीत मांडले.


Tags: Dattatray BharneLivestock Insurance SchemeShepherdsदत्तात्रय भरणेपशुधन विमा योजनामेंढपाळ
Previous Post

नवं मद्यार्क धोरण! आता फळा-फुलांपासून बनवलेली देशी असणार विदेशी!!

Next Post

एल्गार परिषद प्रकरण: तिसऱ्या न्यायाधीशांचा सुनावणीस नकार! असं का?

Next Post
mumbai high court

एल्गार परिषद प्रकरण: तिसऱ्या न्यायाधीशांचा सुनावणीस नकार! असं का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!