मुक्तपीठ टीम
देशातील प्रमुख संशोधन संस्थांमध्ये गणल्या जाणार्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) आपल्या कर्मचार्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संस्थेच्या सुविधांचे सरकारविरोधी, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. टीआयएफआरने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेषत: मुलांना अशा गोष्टी पोस्ट करण्यापासून रोखण्यास सांगितले आहे. मात्र, ही बातमी समोर आल्यावर टीआयएफआरने स्पष्ट केले की, हा आदेश नवीन नाही. सूचनांबाबतच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला.
TIFR is policing its employees and their ‘family members’ from sharing ‘anti-government’ content in social media. This gag order is an attack by government on free speech and censoring of criticisms against the authoritarian regime that we have. @ndtv @thenewsminute @thewire_in pic.twitter.com/sb2FZpHmgP
— APPSC IIT Bombay (@AppscIITb) April 15, 2022
संस्थेने परिपत्रक जारी केले
- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने एक परिपत्रक जारी करून संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे की, इन्स्टिट्यूट, फील्ड स्टेशन, निवासी मालमत्ता किंवा इतर कोणत्याही सरकारी मालमत्तेशी संबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणे टाळावे.
- कर्मचार्यांना पुढे सूचित केले जाते की सोशल मीडियावर कोणतेही सरकार विरोधी साहित्य अपलोड करणे टाळावे.
- तसेच कुटुंबातील सदस्यांनाही याची जाणीव करून द्यावी.
शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला!
- अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत स्वायत्त संस्था TIFR ने स्पष्ट केले की नोटिशीचा अर्थ असा होता की त्याचा “चुकीचा अर्थ लावला” गेला.
- संस्था किंवा सरकारवर जाहीर टीका करण्यापूर्वी परवानगी घेणे नेहमीच बंधनकारक असते.
- नोटीसमध्ये नमूद केलेले नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि हे नियम सोशल मीडिया तसेच टेलिव्हिजन आणि प्रिंट मीडियासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना लागू होतात, हे स्पष्ट करण्यासाठी नवीन पत्र पाठवण्यात आले आहे.
- टीआयएफआरने यासंदर्भात डीएईच्या नोटीसनंतर १३ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगितले.
त्याची गरज का होती?
- १३ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात, TIFRचे रजिस्ट्रार विंग कमांडर जॉर्ज अँटनीने (निवृत्त), अणुऊर्जा विभागाद्वारे अधिसूचित केलेल्या टिप्पण्यांचा संदर्भ देत सांगितले की, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर DAE कार्यालये आणि सुविधांचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले गेले आहेत.
- त्यांनी सांगितले की काही असंतुष्ट कर्मचारी सोशल मीडियावर सरकारविरोधी गोष्टी शेअर करत आहेत.
- याबाबत, टाटाच्या TIFR संस्था केंद्रे, फील्ड स्टेशन, निवासी वसाहती किंवा इतर कोणत्याही सरकारी मालमत्तेशी संबंधित कोणताही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये, असे निर्देशांमध्ये म्हटले आहे.
- तसेच, कोणतेही वादग्रस्त विधान शेअर करू नका, कारण यामुळे सुरक्षा बिघडू शकते किंवा काही गंभीर माहिती चुकीच्या हातात जाऊ शकते.