मुक्तपीठ टीम
गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या भडक्यामुळे त्रस्त झालेल्या सामान्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. ही वाढ ५ ते १० रुपयांची नसून थेट ५० रुपयांची आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीनं महागाई भडकण्याचा धोका असतानाच आता त्यात घरगुती गॅसच्या महागाईची भर पडली आहे. आतापर्यंत ६९४ रुपयांमध्ये मिळणारा घरगुती प्रति गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपये झाली आहे.
गॅस भडकतोय…
- पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याला किंमती निश्चित करत असतात.
- यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी विना अनुदानित सिलिंडर २५ रुपयांनी महाग झाले होते.
- आता घरगुती नेहमीच्या गॅसच्या किंमतीत ५० रुपयांनी दर वाढ झाली.
व्यावसायिक गॅस महागले
- इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना महागाईचा झटका दिला.
- १९ किलो वजनाच्या व्यासायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे.
- व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर १९० रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत.
एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत अशी तपासा
- स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल.
- कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात.
- हे दर https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकतो.