मुक्तपीठ टीम
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने प्रशासकीय आणि न्यायिक सदस्याच्या एकूण २४ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवारांनी पदांनुसार, संबंधित क्षेत्रातील पात्रता आणि अनुभवही असणे गरजेचे.
वयोमर्यादा
प्रशासकीय आणि न्यायिक सदस्याच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षेाच्या वर नसावे
अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम उमेदवारांनी www. mod.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट भेट द्या
- अर्ज भरा व तो डाउनलोड करा
- सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून मग तो अर्ज सचिव, संरक्षण विभाग, कक्ष क्रमांक 199-सी, साउथ ब्लॉक, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली-110011 या पत्त्यावर पाठवावा.
अधिक माहितीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट www.aftdelhi.nic.in वरून माहिती मिळवू शकता.