मुक्तपीठ टीम
होळीनंतर भारतात खऱ्या उन्हाळ्याला सुरूवात होते. या एप्रिल महिन्यातच तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. भर उन्हात घराबाहेर पडणे म्हणजे डोकेदुखीच. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि लिंबाच्या वाढत्या किमतींमुळे लोकांना आधीपासूनच घाम फुटत आहे. अशा परिस्थितीत माणूस थंड कसा राहिल? यासाठी एका रिक्षा चालकाने एक भन्नाट कल्पना लढवली आहे. खरं तर, या रिक्षावाल्याने उन्हात थंड राहण्यासाठी आपल्या रिक्षाला नवा लूक दिला आहे, त्यासाठी त्याने झाडे आणि गवताचा वापर केला आहे. यामुळे रिक्षा इतर रिक्षांपेक्षा कमी उष्णता घेते!
लोकांना रिक्षावालाची कल्पना आवडली
- व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोमध्ये ही ‘रिक्षा’ सर्वसामान्य रिक्षांपेक्षा खूपच वेगळी दिसते.
- कारण त्यावर भरपूर हिरवळ आहे.
- रिक्षा चालकाने रिक्षाच्या छतावर गवत उगवले आहे आणि कुंडीत काही रोपेही लावली आहेत.
- रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हात थंडावा मिळावा यासाठी या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.
उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी रिक्षावाल्याचा जुगाड!
To beat the soaring summer heat, a auto driver has turned his rickshaw into a mini garden with a significant green cover
He says it will help his passengers stay cool in sorching heat
He is from #Assam
Similar autos also found in #Pune #Kolkata#Salute #Inspiring #BharatKeVeer pic.twitter.com/BhwVEGcvAr— Srikanth Matrubai (@SrikantMatrubai) April 12, 2022
हा फोटो ट्विटर यूजर एरिक सोल्हेमने ४ एप्रिल रोजी शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या भारतीय माणसाने उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी त्याच्या रिक्षावर गवत वाढवले. खरंच… हे आश्चर्यकारक आहे!’ ट्विटरवर एरिक यांच्या पोस्टला २०.९ हजार लाईक्स आणि २ हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटरवरील यूजर्सच्या प्रतिक्रिया
- या प्रकरणाला उत्तर देताना ट्विटर यूजरने लिहिले की, खरोखर ही एक आश्चर्यकारक कल्पना आहे. इतर रिक्षाचालकांनीही असेच केले पाहिजे. कारण एप्रिल महिना आहे आणि तापमान आधीच ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
- त्याचवेळी, आणखी एका युजरने लिहिले की, आम्हाला रस्ते, गल्ल्या आणि वसाहतींमध्ये अशा रिक्षांची गरज आहे. आता तापमान वाढत आहे. हे थांबवण्यासाठी अशी आणखी पावले उचलण्याची गरज आहे. त्याचबरोबर अनेक लोक या रिक्षा चालकाच्या कल्पनेचे खूप कौतुक करत आहेत.
अशा रिक्षा आणखी हव्यात!
पाहा व्हिडीओ: