Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात ‘हुनर हाट’, देशभरातील कारागिरांच्या उत्पादनांचा स्वदेशी बाजार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Hunar hat

मुक्तपीठ टीम

देशाच्या प्रत्येक भागात ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव देणारा, कौशल्य कुबेरांचा ४० वा ‘हुनर हाट’ २७ एप्रिलपर्यंत मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील हजाराहून अधिक कारागिरांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहचवातानाच मुंबईकर ग्राहकांनाही देशङभरातील पारंपरिक दर्जेदार कलाकृतींच्या उत्पादनांच्या खरेदीची संधी मिळणार आहे. या हाटमध्ये केवळ खरेदीच नाही तर खा-प्या-मजाही करता येणार आहे. सोबतीला मनोरंजनही आहेच!

 

मुंबईत ४० व्या ‘हुनर हाट’ निमित्त केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री आणि उपनेता राज्यसभा, मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या हुनर हाट चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते, रविवारी म्हणजेच १७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता होईल अशी माहिती त्यांनी दिली.

 

कारागीर, विणकर, शिल्पकारांच्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या, चाळीसाव्या विक्रमी “हुनर हाट” चे अभूतपूर्व आणि भव्य आयोजन मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात, ३१ पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास १००० विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत.

 

Vocal For Local!

‘हुनर हाट’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘स्वदेशीतून स्वावलंबन’ या संकल्पनांचा सशक्त, यशस्वी, सुदृढ, आणि प्रभावी प्रकल्प म्हणून सिद्ध होतो आहे, असे नक्वी यांनी यावेळी सांगितले. ‘हुनर हाट’ ने एकीकडे देशाच्या शतकानुशतकांची परंपरा असलेल्या शिल्पकला, विणकला या पारंपरिक कलांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रोत्साहन यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, तर दुसरीकडे ९ लाखांपेक्षा जास्त विणकर आणि शिल्पकारांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात टक्क्यांहून अधिक महिला कारागिरांचा समावेश आहे. आजपर्यंत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ३९ हुनर हाट मध्ये प्रत्येक हुनर हाटला सरासरी ८ ते १० लाख लोकांनी भेट दिली आहे. अशाप्रकारे आज पर्यंत ‘हुनर हाट’ मध्ये ४ कोटी पेक्षा जास्त लोक खरेदी करायला आणि कौशल्य कुबेरांचा उत्साह वाढवायला आले आहेत आणि वेगवेगळ्या गीत संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला आहे.

 

नक्वी म्हणाले की, ‘हुनर हाट’ मुळे देशातल्या दुर्गम भागांतून शिल्पकार, विणकरांच्या कलेला मंच देऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात आली आहे. ‘हुनर हाट’, ‘स्थानिक उत्पादनांना जागतिक ब्रँड’ बनविण्यासाठीचे भक्कम व्यसपीठ ठरले आहे.

नव्या पिढीला वारसा पुढे नेण्यास प्रोत्साहन!

विणकाम आणि शिल्पकलेशी संबंधित कुटुंबांची तरुण पिढी आपल्या स्वदेशी वारशापासून दूर जात आहे. या उत्पादनांना बाजारपेठ आणि संधी नसल्यामुळे हा वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी विणकर, शिल्पकार, कारागीरांच्या पिढीजात वारशाचा विकास आणि संवर्धनासाठी प्रभावी पावले उचलली आहेत, असेही नक्वी यांनी सांगितले. ‘हुनर हाट’ सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनातून आता विणकर, शिल्पकारांची तरुण पिढी आपला पिढीजात वारसा पुढे नेत आहे. त्यांना ‘हुनर हाट’ ने अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणल्याची माहिती त्यांनी दिली.

 

हुनर हाटचा भारतीय कारागिरांना फायदा!

आज ‘हुनर हाट’चा प्रत्येक विणकर, शिल्पकार, कारागीर मोठ्या संख्येने स्वदेशी उत्पादनांची विक्री करत आहे. यामुळे विणकर, शिल्पकारांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती आली आहे. ‘हुनर हाट’ने महिला विणकरांना, शिल्पकारांच्या आकांक्षांना नवी उंची, नवी आशा दिली आहे. ‘हुनर हाट’ मध्ये महिला विणकर, कारागिरांच्या मेहनत आणि यशाच्या अनेक गाथा आहेत. या महिला विणकर, शिल्पकार स्वतःच्या प्रगतीसोबतच आपल्या कुटुंबाला देखील समृद्ध करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

 

देशभरातील हजारावर विणकर, शिल्पकार, कारागीर !

मुंबईत, वांद्रे कुर्ला संकुलमधील ‘हुनर हाट’ मध्ये ३१ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील जवळपास १००० विणकर, शिल्पकार, कारागीर सहभागी होत आहेत, ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर, शिल्पकारांचा समावेश आहे. मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपुर, बिहार, आंध्रप्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळसह देशातील प्रत्येक क्षेत्रातून नावाजलेले कारागीर आपली सुंदर हस्तनिर्मित दुर्मिळ उत्पादने घेऊन आले आहेत.

 

खा – प्या – मजा करा!

‘हुनर हाट’च्या उपहारगृहात (फूड कोर्ट) इथे येणारे लोक देशाच्या विविध भागांतील पारंपारिक पदार्थांचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलीयन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण आहेत.

 

मुंबईच्या हुनर हाटमध्ये मनोरंजनही!

१२ दिवस चालणाऱ्या मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये येणाऱ्या लोकांना प्रसिद्ध कलाकारांच्या विविध गीत – संगीताच्या भव्य कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. अन्नू कपूर, पंकज उधास, सुदेश भोसले, सुरेश वाडेकर, साधना सरगम, अमित कुमार, शैलेन्द्र सिंह, शब्बीर कुमार, महालक्ष्मी अय्यर, भूमि त्रिवेदी, कविता पौडवाल, दलेर मेहदी, अल्ताफ राजा, रेखा राज, उपासना सिंह (हास्य कलाकार), एहसान कुरैशी (हास्य कलाकार), भूपिंदर सिंह भुप्पी, रानी इन्द्राणी, मोहित खन्ना, प्रिया मलिक, व्हीआयपी हास्यकलाकार, जॉली मुखर्जी, प्रियंका मैत्रा, विवेक मिश्रा, दीपक राजा (हास्य कलाकार), अदिति खांडेगल, अंकिता पाठक, सिद्धांत भोसले, राहुल जोशी, सुप्रिया जोशी, भूमिका मलिक, प्रेम भाटिया, पोश जेम्स आदि कलाकार आपले कार्यक्रम सदर करतील. 26 एप्रिल रोजी मेगा शो चे आयोजन केले जाईल ज्यात लेझर शो प्रमुख आकर्षण असेल. या व्यतिरिक्त प्रसिद्ध कलाकार अन्नू कपूर यांचा ‘अंताक्षरी’ हा कार्यक्रम देखील आकर्षणाचा केंद्र बिंदू असेल.

 

देशभरात होणार हुनर हाट!

येत्या काळात अहमदाबाद, भोपाळ, पटना, जम्मू, चेन्नई, आग्रा, प्रयागराज, गोवा, जयपुर, बेंगलुरु, कोटा, सिक्किम, श्रीनगर, लेह, शिलॉंग, रांची, अगरतला आणि इतर शहरांत देखील ‘हुनर हाट’ चे आयोजन केले जाईल, अशी माहिती नक्वी यांनी दिली.

उद्घाटनाला महाराष्ट्रातील मान्यवर!

उदघाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, लोकसभा सदस्य खासदार पूनम महाजन, खासदार अरविंद सावंत, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार मनोज कोटक, खासदार नवनीत राणा, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, आमदार झिशान बाबा सिद्दिकी, आमदार गणेश नाईक आणि इतर लोकप्रतिनिधी आणि केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.


Tags: bandra kurla complexGood news MorningHunar HaatmumbaiVocal For Localमुंबईवांद्रे-कुर्ला संकुलव्होकल फॉर लोकलहुनर हाट
Previous Post

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे गरजू विद्यार्थ्यांना, १३१ नोकरदार, गृहिणींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Next Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या ८ जागांसाठी भरती

Next Post
SBI

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या ८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!