मुक्तपीठ टीम
२५ मे २०२० पासून देशांतर्गत विमानांची उड्डाणे पूर्ववत सुरु झाली. त्यानंतर सेवा वाढू लागली. आता १२ फेब्रुवारी रोजी २,३४९ विमानं सेवेत आली. देशांतर्गत प्रवाशांची संख्या २,९७,१०२ पर्यंत वाढली होती, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री (स्वतंत्र अधिभार) हरदिप एस पूरी यांनी दिली. ते म्हणाले की, लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे. सुरक्षितता, कार्यतत्त्परता आणि वेळ कमी लागत असल्यामुळे प्रवासाचे माध्यम म्हणून हवाई प्रवासाला प्राधान्य देत, जवळपास पूर्व – कोरोना काळातील प्रवासी संख्येचा टप्पा आता गाठला जात आहे, अशी पुरी यांनी माहिती दिली.
१२ फेब्रुवारी २०२१ रोजी एकूण ४६९७ विमाने सेवेत होती. भारतीय विमानतळांवर उतरणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या ५,९३,८१९ इतकी होती. कोरोना महामारीच्या परिणामामुळे देशांतर्गत विमान उड्डाणे २४ मार्च २०२० रोजी मध्यरात्रीपासून (रात्रौ ११.५९) बंद करण्यात आली होती. ही उड्डाणे दोन महिन्यांनंतर, २५ मे २०२० पासून पूर्ववत करण्यात आली.
पाहा व्हिडीओ: