मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदाने कृषी विपणन अधिकारी (AMO) आणि सहाय्यक उपाध्यक्ष (AVP) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरतीद्वारे पात्र उमेदवारांच्या एकूण १०० पदांची निवड केली जाईल. यापैकी ४७ पदे कृषी विपणन अधिकारी (AMO) आणि ५३ पदे सहाय्यक उपाध्यक्ष (AVP) साठी आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन असेल. इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर २६एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- आता होम पेजवर दिसणार्या करिअर पेजवर क्लिक करा.
- आता करंट ओप्पोरच्युनिटी विभागात जा.
- आता संबंधित रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
- आता विनंती केलेली माहिती टाकून अर्ज भरा.
- आता अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- अर्ज डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवारांनी पदांनुसार, संबंधित क्षेत्रातील पात्रता आणि अनुभवही असणे गरजेचे.
वयोमर्यादा
सहाय्यक उपाध्यक्ष (AVP) आणि कृषी विपणन अधिकारी (AMO) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे
बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.co.in वरून माहिती मिळवू शकता.