मुक्तपीठ टीम
स्मार्टवॉचची वाढती लोकप्रियता पाहून फेसबुक आता या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फेसबुक स्वत:च्या स्मार्टवॉचवर काम करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्याला त्यांच्या सेवांद्वारे (उदा. व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजर) मेसेज पाठविता येईल. याशिवाय अनेक आरोग्य आणि फिटनेस फीचर्सही यात उपलब्ध असतील. पुढील वर्षी त्याची विक्री सुरू होऊ शकते, तथापि कंपनीने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
स्मार्टवॉच फेसबुकच्या वाढत्या हार्डवेअर इकोसिस्टमचा एक भाग असेल. यात आधीपासूनच व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट, व्हिडिओ-कॉलिंग डिव्हाइस आणि अपकमिंग ऑग्मेंट रियालिटी स्मार्ट ग्लास समाविष्ट आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फेसबुकने प्रोजेक्ट-आरियाचा भाग म्हणून रे-बॅन ब्रांडेड चष्मे योजना शेअर केली होती.
सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह लॉन्च होणार वॉच
फेसबुक अँड्रॉइड-आधारित स्मार्टवॉच काम करत आहे करत आहे. तथापि, ते गूगल व्हेरेबल ओएसवर चालेल की नाही ते अजून अस्पष्ट आहे. पुढील वर्षी स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध असू शकेल. फेसबुक स्मार्टवॉच आरोग्य आणि फिटनेस फिचर्ससह उपलब्ध असेल, जे आता जवळजवळ प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे स्मार्टवॉच वापरकर्त्यांना मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसह फेसबुकच्या सेवांचा वापर करुन मेसेज पाठविण्याची परवानगी देऊ शकते. स्मार्टवॉच सेल्युलर कनेक्टिव्हिटी (4 जी / 5 जी) सह येण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा म्हणजे मोबाईलशिवाय वापरकर्ते इतरांशी संवाद साधू शकतील. फेसबुक देखील स्वत: ची ऑपरेटिंग सिस्टम विकसित करीत आहे. ही ओएस फेसबुकच्या भविष्यातील गॅजेटमध्ये असू शकेल.
ही डिव्हाइस फेसबुकच्या हार्डवेअर इकोसिस्टममध्ये आहेत
फेसबुक स्मार्टवॉच कंपनीच्या हार्डवेअर इकोसिस्टमचा भाग असेल. यात सध्या ओक्युलस व्हर्चुअल रियलिटी हेडसेट आणि व्हिडिओ कॉलिंग डिव्हाइसची एक श्रेणी समाविष्ट असेल,ज्यात पोर्टल टीव्ही, पोर्टल, पोर्टल + आणि पोर्टल समावेश असेल.
पाहा व्हिडीओ: