तुळशीदास भोईटे
शिवाजी पार्कवरील गुढी पाडवा मेळ्याव्यातील भोंगा अजानविरोधी गर्जनेनंतर मनसे पुन्हा चर्चेत आली. खरंतर इंजिन वाफा सोडू लागलं आहे. शिट्ट्या मारू लागलं आहे. मात्र, राज ठाकरेंनी मनसेच्या इंजिनाला वेग देण्यासाठी जे भोंगाविरोधी मुद्द्यांचे कोळसे वापरले ते मनसेसाठी काही साइड इफेक्ट देणारेही ठरले.
मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे हे पहिले भोंगाबळी ठरले. त्यांनी मतदारसंघातील धार्मिक समीकरणं मांडलं. त्यामुळे आपण भोंगाविरोधी आंदोलन करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यांनी ज्या साईनाथ बाबर यांचंही मुस्लिम मतदार जास्त असल्यानं नुकसान होईल म्हटलं. त्यांनाच राज ठाकरेंनी पुणे शहरप्रमुख नेमलं आणि त्या पदावरून वसंत मोरेंची हकालपट्टी झाली. त्यानंतर पुढे राज ठाकरेंनी वसंत मोरेंना घरी बोलवले. त्यानंतर वसंत मोरेंनी मी मनसेसोबतच असल्याचं स्पष्ट करत संघर्षाच्या वनवासानंतरच राजयोग लाभतो, असे जाहीर केले.
मी माझ्या साहेबांसोबत…
आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!
🚩🙏 जय श्रीराम 🚩🙏 pic.twitter.com/4eAfvgf5wx
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 11, 2022
तरीही इतर काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करायचा तो केलाच. त्यामुळेच उलट सुलट चर्चा सुरु असताना राज ठाकरे भूमिका मांडण्यासाठी ठाण्यात सभा घेणार असल्याचं जाहीर झालं. त्यानुसार गेले काही दिवस त्याच सभेची चर्चा होत आहे. राज ठाकरेंची उत्तर सभा!
भाजपाला इव्हेंटसाठी ओळखलं जातं. पण शिवसेना आणि मनसे हे पक्षही काही कमी नाहीत. तेही वातावरण निर्मितीत खूप पुढे असतात. त्यात मनसे तर क्रिएटिव्हीटीमुळे आणखीच सरस. राज ठाकरेंची उत्तरसभा चर्चेत आणण्यासाठी मनसेनं टिझर लाँच केला.
या टिझरमधील आवाज हा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा असल्याच्या बातम्या टीव्ही चॅनल्सवर झळकल्या. पण पुढे मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विटरवर स्पष्ट केलं. ते म्हणालेत, “काल एका व्हिडिओबाबत ‘बाळासाहेबांच्या आवाजात मनसेचा दुसरा टीजर’ असा उल्लेख अनेक ठिकाणी पाहण्यात आला. श्री. राजसाहेब ठाकरेंच्या मनसेचा ‘वारं खूप सुटलंय’चा हा मूळ व्हिडिओ.. कै. बाळासाहेब आणि श्री. राजसाहेब या दोघांचीही वक्तृत्व शैली, खणखणीत आवाज ‘ठाकरी’ असल्यामुळे हा समज झाला असावा!”
काल एका व्हिडिओबाबत ‘बाळासाहेबांच्या आवाजात मनसेचा दुसरा टीजर’ असा उल्लेख अनेक ठिकाणी पाहण्यात आला. श्री. राजसाहेब ठाकरेंच्या मनसेचा ‘वारं खूप सुटलंय’चा हा मूळ व्हिडिओ.. कै. बाळासाहेब आणि श्री. राजसाहेब या दोघांचीही वक्तृत्व शैली, खणखणीत आवाज ‘ठाकरी’ असल्यामुळे हा समज झाला असावा! pic.twitter.com/CExelUY88G
— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) April 12, 2022
राज ठाकरेंच्या उत्तरसभेकडून काय अपेक्षा आहेत?
आधी मनसेच्या पाहूया…
मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी “राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना “लावरे तो व्हिडीओ”ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा” असं म्हटलंय.
राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना “लावरे तो व्हिडीओ”ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 12, 2022
अविनाश जाधव यांनी
सामर्थ्यशील महाराष्ट्र,
स्वाभिमानी महाराष्ट्र,
दिशादर्शक महाराष्ट्र,
संवेदनशील महाराष्ट्र..
‘महाराष्ट्रधर्म’ जाणून घेण्यासाठी नक्की या..
#उत्तरसभा
असं ट्वीट करत पुढील दिशेची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सामर्थ्यशील महाराष्ट्र,
स्वाभिमानी महाराष्ट्र,
दिशादर्शक महाराष्ट्र,
संवेदनशील महाराष्ट्र..‘महाराष्ट्रधर्म’ जाणून घेण्यासाठी नक्की या..#उत्तरसभा
— avinash jadhav (@avinash_mns) April 12, 2022
अखिल चित्रे यांचं “सुशिक्षित” असून चालत नाही “सुजाण” सुद्धा असावं लागतं. अर्थात,पुढारी बनणे हे अत्यंत जबाबदारीचे काम त्यासाठी तुम्ही फक्त उच्चशिक्षित असून चालत नाही.इतरही गुण आत्मसात करणे महत्त्वाचे.पुरोगामी महाराष्ट्रात जातिभेद,उच्च-नीच मानणारे युवक आजही आहेत हे बघून मान खाली जाते.” असं ट्वीट सुजात आंबेडकर यांना उद्देशून केलं आहे. त्यामुळे सुजात आंबेडकरांनी दिलेल्या अमित ठाकरेंना आधी रस्त्यावर उतरवा, या आव्हानावर राज काहीतरी भूमिका मांडतील अशी अपेक्षा आहे.
“सुशिक्षित” असून चालत नाही “सुजाण” सुद्धा असावं लागतं @AmbedkarSujat
अर्थात,पुढारी बनणे हे अत्यंत जबाबदारीचे काम त्यासाठी तुम्ही फक्त उच्चशिक्षित असून चालत नाही.इतरही गुण आत्मसात करणे महत्त्वाचे.पुरोगामी महाराष्ट्रात जातिभेद,उच्च-नीच मानणारे युवक आजही आहेत हे बघून मान खाली जाते.— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) April 12, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मदरशांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांना आव्हान दिलं. वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेल, अशी आव्हानात्मक भाषा वापरली. त्यांनाही राज ठाकरे त्यांच्याच ठाण्यातील उत्तर सभेत नक्कीच उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.
तसेच हा आठवडा गाजवला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याने. योगेश चिले यांनी त्यावर ट्वीट केलं आहे. पोलिसांनी गृहखात्याला माहिती दिली होती, असा उल्लेख करत त्यांनी हल्ल्याबद्दल संशय व्यक्त केला. त्या हल्ल्यावर, एसटी संपावरही ही राज ठाकरे बोलतील अशी अपेक्षा आहे.
५ एप्रिलला पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन होणार असा अहवाल गोपनिय खात्याने ४ एप्रिललाच @vishwasnp यांना दिला होत.. गृहखात राष्ट्रवादीकडे आहे.. तरीही बंदोबस्त लावला नाही.. यावरून पवार साहेबांनाच घरासमोर आंदोलन हव होत अशी शंका निर्माण करते.#करामतीकर@SandeepDadarMNS @Awhadspeaks pic.twitter.com/d3XJzrEL4B
— Yogesh J Chile (@chileyog) April 12, 2022
मनसेच्या घडामोडी मांडणाऱ्या मनसे रिपोर्ट या हँडलने “कोणा कोणाला हवा होता “लाव रे तो व्हिडीओ”..?” असा मिश्किल प्रश्न विचारत इतर पक्षांच्या नेत्यांच्या बदलत्या भूमिका मांडणारे व्हिडीओ पाहायला मिळतील, अशी शक्यता निर्माण केली आहे.
कोणा कोणाला हवा होता “लाव रे तो व्हिडीओ”..?#उत्तरसभा
— MNS Report | मनसे रिपोर्ट (@mnsreport9) April 11, 2022
एकीकडे हे सारे असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडून इतरही काही समस्यांवर आवाज उठवला जाईल, अशी शक्यता आहे.
मनसेचे कामगार नेते मनोज चव्हाण यांनी केलेलं ट्वीट वीजसमस्या मांडतं. संतापही.
“भरोसा ठेवा…😊
लाईट येईल किंवा जाईल,
पण बिल मात्र येणारच..
कोळसा संपला आहे
कागद नाही..
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी”
हे ट्वीट थेट सभेबद्दल नसलं तरी महाराष्ट्रातील सध्याच्या दिवसातील सर्वात भीषण समस्या मांडणारे आहे. त्यामुळे राज ठाकरे त्यावर नक्कीच बोलतील. एकीकडे महाराष्ट्रद्रोहाचे इतरांवर आरोप आणि दुसरीकडे गुजरातमधील कंपनीकडून वीज खरेदी यावर ते आघाडीला शॉक देतील अशी अपेक्षा आहे.
भरोसा ठेवा…😊
लाईट येईल किंवा जाईल,
पण बिल मात्र येणारच..
कोळसा संपला आहे
कागद नाही..
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी
@mnsadhikrut @ChitraKWagh @NitinRaut_INC @TV9Marathi @RajThackeray @CMOMaharashtra— Manoj B Chavan (@ManojBChavan5) April 12, 2022
त्याचबरोबर शिक्षकभरती, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक, अंगणवाडी सेविका, एमपीएससी परीक्षा-भरती-नियुक्ती वगैरेसारख्या मुद्द्यांवरही राज ठाकरेंनी हात घालावा अशीही अपेक्षा आहे. तसेच महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावरही त्यांनी आग ओकावी अशी अपेक्षा आहे.
जाता जाता शेवटी मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी केलेले ट्वीट…
- माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन…
- आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन…
- बहुधा मराठीत्व टिकवत हिंदुत्व अशीच आक्रमक भूमिका स्पष्ट करणारी ही उत्तर सभा असेल…
#उत्तरसभा
माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन…
आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन…#उत्तरसभा #ठाणे pic.twitter.com/W3fLSxNo80
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) April 12, 2022
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
पाहा व्हिडीओ: