मुक्तपीठ टीम
दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, तर दंगलीसाठी रस्त्यावर उतरणारे ही बहुजन मुलं असतात, असा अनुभव आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना आधी रस्त्यावर उतरवावं, असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. त्यांच्या त्या आव्हानाला टीव्ही9 चॅनलशी बोलताना मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सुजात आंबेडकरांचे जातीवर बोलण्याचे वय नाही. त्यांनी आपलं आडनाव विसरू नये. मान राखावा. तसेच प्रकाश आंबेडकरांनी सुजातवर असे जातीपातीचे संस्कार करू नये, असा सल्लाही अमेय खोपकरांनी दिला.
सुजात आंबेडकर मनसेच्या नव हिंदुत्वाविरोधात आक्रमक
- सुजात आंबेडकरांनी मनसेनं नव्यानं हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून आक्रमक टीका केली आहे.
- इतरांना सांगण्याआधी अमित राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी.
- आता सुजात आंबेडकर यांनी त्यापुढची आक्रमक भूमिका घेतली आहे.
- आतापर्यंत आपण कितीतरी दंगली बघितल्या आहेत.
- बाबरी मशिदीपासून भीमा कोरेगावपर्यंत अनेक दंगली.
- दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात.
- त्यांच्यामुळे रस्त्यावर उतरणारे हे बहुजन मुलं असतात.
- त्यामुळे राज ठाकरेंनी आधी मुलाला रस्त्यावर उतरवावं, त्याला रस्त्यावर उतरवणार नसालस तर बहुजन मुलांनाही उतरवू नये.
मनसेकडून सुजात आंबेडकरांना कडक प्रत्युत्तर
- मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना टीव्ही9मराठी चॅनलशी बोलताना त्यांनी कडक प्रत्युतर दिले आहे.
- सुजात आंबेडकरांचे वय हे जाती-पातीवर बोलण्याचे नाही.
- सुजातने विसरू नये की त्यांचे घराणे किती मोठे आहे.
- मी त्यावर बोलावं इतका मोठा नाही. त्यांनी त्याचा मान राखावा. लक्षात ठेवावं आपलं आडनाव काय?
- मला प्रकाश आंबेडकरांना सांगायचं, तुम्ही मुलावर असे संस्कार करु नका. तुम्ही जातीपातीचे राजकारण या मुलांना शिकवू नका.