मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मनसे नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. वसंत मोरेच्या हकालपट्टीनंतर त्यांना इतर पक्षांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. मात्र, वसंत मोरे यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बोलवल्यानंतर त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच ‘शिवतीर्थ’ येथे वसंत मोरेंनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्वीट करत “मी माझ्या साहेबांसोबत” असल्याचे सांगितले. त्याच ट्वीटमधील “आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!” हे वाक्य राजकीय वर्तुळात लक्ष वेधणार ठरले आहे.
भेटीनंतर वसंत मोरेंचं ट्वीट!
- राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी यांनी ट्वीट केले आहे.
- “मी माझ्या साहेबांसोबत…आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
- त्यामुळे सध्या तरी वसंत मोरे दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार नसल्याचे दिसते आहे.
- त्यांच्या ट्वीटमध्ये पुण्याचे मनसेचे नवीन शहराध्यक्ष आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासोबतचे छायाचित्रही आहे.
मी माझ्या साहेबांसोबत…
आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!
🚩🙏 जय श्रीराम 🚩🙏 pic.twitter.com/4eAfvgf5wx
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 11, 2022
राज यांच्या भेटीनंतर वसंत मोरेंच्या शंका दूर!
- मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ येथे भेट घेतली.
- भेटीनंतर आपण १०० टक्के समाधानी असल्याचे वसंत मोरे यांनी माध्यमांना सांगितले.
- वसंत मोरे यांनी या भेटीनंतर सांगितले की, आपल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत.
- आपण पक्षातच राहणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
- राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
- राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आपली अडचण झाली असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं होतं.
- यानंतर मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी साईनाथ बाबर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.
- महत्त्वाचं म्हणजे नाराज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती.
- मात्र त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.
- अखेर रविवारी राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाल्यानंतर सोमवारी ही भेट झाली.