गौरव संतोष पाटील
पालघर जिल्ह्याच्या किनार पट्टीवर आणि उथळ पाणथळ भागात दर वर्षी विविध देशी विदेशी पक्षी येत असतात. साधारपणे हिवाळ्यात अशा विदेशी पक्षांच्या स्थलांतराला सुरुवात होते. हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी विविध देशांत भ्रमंती करत असतात. थंडी कमी होताच पुन्हा हे पक्षी आपल्या माय देशी परतण्यासाठी परतीचा प्रवास करतात. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यांत यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. अशाच परतीच्या प्रवासात असलेल्या उत्तर अमेरिकेतील पक्षाचे पालघरमध्ये दर्शन झाले आहे. एरवी या पक्षाची पिसे ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची दिसतात. पण जेव्हा हा पक्षी विणीचा हंगामात येतो तेव्हा ह्या पक्षाच्या पिसांना लाल रंग येऊ लागतो. छातीवरील पिसांना देखील राल रंग येण्यास सुरुवात होते.
विणीच्या हंगामात येण्याची सुरुवात झाली असल्याने ह्या पक्षाच्या पिसांचा रंग बदलण्यास आता सुरुवात होत आहे. या पक्षाचे दर्शन पालघरमध्ये सातत्याने हो आहे. ते या वर्षी देखील झाले आहे. आधी हा पक्षी पालघर जिल्ह्यातील चिंचणी मधील उथळ पाणथळ भागात ३० ऑक्टोबर २०१६ रोजी त्याच्या नेहमीच्या हंगामात पहिला गेला होता. विणीच्या हंगामात हा पक्षी अधिकच आकर्षक दिसत असल्या कारणामुळे ह्या पक्षाला पाहण्यासाठी पक्षी मित्र हजेरी लावत आहेत.
पालघरमधील नेस्ट या संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या विविध ठिकाणांच्या पक्षी मित्रांकडून पालघर जिल्ह्यात एकूणच ३८० अधिक देशी-विदेशीहून अधिक पक्षांची नोंद करण्यात आली आहे. पलघर मधील पक्षी निरीक्षक आशिष बाबरे, प्रविण बाबरे, भावेश बाबरे, हार्दिक दयाळ आणि नेस्ट या संस्थेतील पक्षी मित्र या देशी विदेशातील स्थलांतरित पक्षांची नोंदीची मोलाची कामगिरी बजावत असतात.