मुक्तपीठ टीम
आतापर्यंत ट्रेनमधून प्रवासी प्रवास करताना दिसतात मात्र घोडा प्रवास करता पहिल्यांदाच दिसला आहे. EMU लोकल ट्रेनच्या मालवाहतूक डब्यात घोडा प्रवास करतानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या व्हायरल पोस्टनंतर आरपीएफने घोड्याच्या मालकाला रेल्वे कायद्यांतर्गत अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
- गफूर अली मुल्ला (४०) यांच्या घोड्याने दमछाक करणाऱ्या शर्यतीत भाग घेतला.
- त्यानंतर मुल्ला यांनी आपला घोडा रेल्वेने दक्षिण दुर्गापूरपासून २३ किमी अंतरावर असलेल्या नेत्रा येथे नेण्याचा निर्णय घेतला होता.
- पूर्व रेल्वेचे प्रवक्ते एकलव्य चक्रवर्ती म्हणाले, “रेल्वे मालमत्तेत काही अश्लील कृत्य करणे आणि ट्रेनमधील जागेचा अनधिकृत कब्जा केल्याबद्दल त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
Horse Inside Local Train 😃
This is a new one .. I have seen Cows & Goats before. #Kolkata
34848 Down SDAH – DH Local
Via FB pic.twitter.com/UTS2lRtJWS— Arpita 🇮🇳 (@arpita_dg) April 8, 2022
चक्रवर्ती म्हणाले की, प्राणी प्रवासी डब्यात जाऊ शकत नाहीत आणि त्यासाठी वेगळा डबा बुक करावा लागेल. डब्यातील महिलांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले जात असताना हा ४० वर्षीय पुरुष आणि त्याचा घोडा संध्याकाळी ट्रेनमध्ये चढले होते, असेही त्यांनी सांगितले.