मुक्तपीठ टीम / कोल्हापूर
जिल्हा बँकेने गेल्या आर्थिक वर्षात शून्य टक्के राखत उच्चांकी १८० कोटीचा ढोबळ नफा कमावला याबद्दल बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
हसन मुश्रीफ म्हणाले बँक स्थापनेपासून पहिल्यांदाच १८० कोटी इतका नफा झालेला आहे. त्यात निर्यात साखर व इथेनॉल मुळे बँकेने साखर कारखानदारीला करावयाच्या कर्जपुरवठा वर फार मोठा परिणाम होत आहे. चांगले नवीन ग्राहक शोधावे लागतील ,नवीन व्यवसायात पैसे गुंतवले लागतील, सर्व पातळ्यावर बँकांची स्पर्धा तयार झालेली आहे. या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सज्ज राहणे काळाची गरज आहे .
ग्राहक आपल्याकडे आपणहून चालत येतील हा भ्रम दूर करा असा सल्ला कर्मचाऱ्यांना हसन मुश्रीफ यांनी दिला .
गेल्या वर्षी सात हजार कोटी ठेवी होत्या नैसर्गिक दहा टक्के वाढ झाली तरी त्या आज घडीला आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. अशी खंत व्यक्त केली चालू आर्थिक वर्षात दहा हजार कोटी रुपये ठेवीच्या आणि २० हजार कोटी रुपये व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसून कामाला लागा असेही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सल्ला दिला.