उदय नरे
देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मुंबईतील निवासस्थानावर काल दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगली शहर जिल्हा व काँग्रेस पक्षाच्या वतीने एकत्रित आज सांगलीमधील स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या मार्गाने व काळ्या फिती बांधुन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पद्माकर जगदाळे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव शेखर माने, गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विष्णु माने, शेडजी मोहीते, नर्गीस सय्यद, स्वाती पारधी, शिवाजी दुर्वै, काँग्रेसचे नगरसेवक अभिजित पाटील, संतोष पाटील, मयुर पाटील,फिरोज पठाण, राष्ट्रवादी सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, धनंजय पाटील, युवराज गायकवाड, असीफ बावा, समीर कुपवाडे, बाळासाहेब गोंधळे, हेमंत खंडागळे, प्रसाद मदभावीकर, विराज कोकणे, सुशांत काळे, सनी गाडे, डॉ.पृथ्वीराज पाटील, नालसाब मुल्ला, गॅब्रियल तिवडे, मुन्ना शेख, सोमनाथ सूर्यवंशी, सुमित कुंभोजकर, अमीन शेख, प्रशांत खांडेकर, सागर माने, सुजित पाटील, आदर्श कांबळे, किशोर हत्तीकर, आयुब बारगीर ,मुस्ताक रंगरेज, सचिन जाधव, कुपवाड शहर अध्यक्ष संजय तोडकर,राष्ट्रवादी मिरज महीला अध्यक्षा वंदना चंदनशिवे, शुभम जाधव, पप्पु कोळेकर, अजित दुधाळ,पिंटू माने,अक्षय शेंडगे,आदित्य नाईक,महालिंग हेगडे, आबा कोळी, अर्जुन चव्हाण, उत्तम आबा कांबळे, लीना यादव, सुरेखा सातपुते, रूपाली कारंडे, छाया जाधव, गणेश तेली,संजय औंधकर, सागर माने, सद्दाम मुजावर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(उदय नरे हे पेशाने शिक्षक असून पत्रकारितेतही सक्रिय असतात.)