Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता: ८११ झाडांवर नोटीस, पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर आढावा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Goregaon Mulund Junction

मुक्तपीठ टीम

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या रुंदणीकरणासाठी १३०० झाडांचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना, झाडे वाचविण्यासाठी पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.पूर्व द्रुतगती मार्ग ते खिंडीपाडा दरम्यानच्या ८११ झाडांवर पालिकेने पुन्हा एकदा नोटिसा लावल्या आहेत. ८११ झाडांवर नोटीसा चिकटवल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण वाद्यांनी आक्षेप घेतला आहे.

 

झाडे वाचवता येतील का याबाबत अभ्यास करणार…

  • या रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे १३०० झाडे हटवावी लागणार आहेत.
  • ही झाडे हटविण्यासाठी पालिकेने २०२० मध्येही झाडांवर नोटिसा लावल्या होत्या.
  • तेव्हा लॉकडाऊन होते.
  • त्यामुळे अनेक नागरिकांना या नोटीसबाबत माहिती मिळाली नसेल.
  • त्यामुळे प्रत्यक्ष झाडे काढण्यापूर्वी ही नोटीस पुन्हा लावण्यात आल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
    तसेच मोठ्या संख्येने झाडे हटवावी लागणार असल्यामुळे आम्ही रस्ते व पूल विभागाला याबाबत पुन्हा एकदा आढावा घेऊन झाडे वाचवता येतील का याबाबत अभ्यास करण्यास सांगितले आहे.
  • त्यांच्या अहवालानंतरच याबाबत कारवाई होईल, असेही ते म्हणाले.

 

…तर ७४५ झाडे पुनरेपित करावी लागणार!

  • गोरेगाव मुलुंड जोडरस्त्यासाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव २०२० मध्ये टप्प्याटप्प्याने वृक्ष प्राधिकरणकडे येत होते.
  • त्यानुसार एकूण १,३४७ झाडे काढण्याचा उल्लेख या प्रस्तावात आहे.
  • त्यापैकी ऐरोली जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाइपलाइन, खिंडीपाडा मुलुंड पश्चिम पर्यंतच्या पट्टय़ातील ८११ झाडांपैकी ६६ झाडे कापावी लागणार आहेत.
  • तर ७४५ झाडे पुनरेपित करावी लागणार आहेत.
  • या झाडांवर पुन्हा नोटीस लावण्यात आली आहे.

 

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता!

  • गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा पालिकेचा एक मोठा प्रकल्प असून त्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.
  • जोडरस्त्याची लांबी १२.२ कि.मी. असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व ) येथील ओबेरॉय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.
  • या प्रकल्पासाठी ऐरोली जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाइपलाइन, खिंडीपाडा मुलुंड पश्चिमेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

Tags: Airoli JunctionBMCgoregaonMulundTree Cuttingऐरोली जंक्शनगोरेगावझाडे कापणीमुंबई पालिकामुलुंड
Previous Post

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यासाठी शासनास प्रस्ताव

Next Post

सिडकोच्या जानेवारी-२०२२ गृहनिर्माण योजनेच्या यशस्वी अर्जदारांची यादी येथे तपासा…

Next Post
List of cidcos jan 2022 applicants

सिडकोच्या जानेवारी-२०२२ गृहनिर्माण योजनेच्या यशस्वी अर्जदारांची यादी येथे तपासा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!