मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर रात्री किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांवर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली. इतकंच नाही तर गुरुवारी सकाळी संजय राऊत यांनी ट्वीट करत सोमय्या बाप-बेटे तुरुगांत जाणार असा दावाही केला आहे.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!
- शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी रात्री अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती.
- त्यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
- त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांचं ट्वीट…
- आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला, देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल.
- किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे.
- लोकांनी आता गप्प बसू नये.
- जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल.
Mark my words
INS विक्रांत चया नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटायाना जेल मध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या bjp ला जाब विचाराच लागेल. pic.twitter.com/juqXvAUa68— Sanjay Raut (@rautsanjay61) April 7, 2022