मुक्तपीठ टीम
आतापर्यंत हिंदू सण उत्सव म्हटलं तर भाजपा, शिवसेना आता मनसेसारखे पक्ष असेच आठवतात. पण आता काँग्रेसही बहुधा मागे राहू इच्छित नाही. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हिंदू सण दणक्यात साजरे करायचे सर्क्युलर जारी केले आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त राज्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून रामायण, सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करण्याचे निर्देश सर्क्युलरमध्ये दिले आहेत. आता काँग्रेस आहे म्हटल्यावर अंतर्गत वाद तर होणारच. तसा तो सर्क्युलरवरही झाला आहे. तसेच भाजपानेही या हिंदू सण साजरे करण्याच्या भूमिकेचीही खिल्ली उडवलीच आहे.
काँग्रेसमधून आक्षेप
- कोणत्याही राजकीय पक्षाने अशी सर्क्युलर जारी करू नयेत.
- आपण सर्व धर्मांना एकत्र घेऊन जातोय.
- सर्क्युलरमध्ये फक्त राम नवमी आणि हनुमान जयंतीचा उल्लेख आहे पण आंबेडकर जयंती, रमजान किंवा गुड फ्रायडेचा उल्लेख नाही.
- मसूद यांनी प्रश्न उपस्थित केला की, सर्क्युलरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना इतर धर्मांशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना का देण्यात आल्या नाहीत?
- जर आपण रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्यासाठी सर्क्युलर जारी करत असाल तर त्यात रमजान आणि इतर धर्मांशी संबंधित सणांचाही उल्लेख केला पाहिजे.
- हे सर्क्युलर कोणत्याही राजकीय पक्षासाठी शोभणारे नाही.
भाजपाकडून खिल्ली
- मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या सर्क्युलरची खिल्ली उडवत मसूद यांचा आक्षेप अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की,मसूद यांना हे पचनी पडत नाही की जो पक्ष इफ्तार पार्टी आयोजित करत होता, तो पक्ष आता मंदिरांच्या फेऱ्या का मारत आहे.
- काँग्रेसचा हिंदू समाजाला जोडण्याचा प्रयत्न म्हणून या सर्क्युलरकडे पाहिले जात आहे. पुढील वर्षी मध्य प्रदेशात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे.