मुक्तपीठ टीम
डस्टर या एसयूव्हीमुळे रेनॉल्ट हा फ्रेंच ऑटोमोबाइल ब्रँड भारतातही लोकप्रिय झाला. त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायगरही चांगली विकली जात आहे. आता रेनॉल्टने कायगरचे अपग्रेड व्हर्जन धडाकेबाज स्पोर्ट्स लूकमध्ये बाजारात आणले आहे. या नवीन मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५.८४ लाख रूपये आहे. कायगर एमवाय२२ मध्ये अॅडव्हान्स फिचर्स आणि सुविधांची क्षमता आहे. या कारमध्ये मल्टी-सेन्स ड्रायव्हिंग मोड, अतिरिक्त केबिन स्टोरेज आणि कार्गो स्पेस यासांरख्या सुविधा आहेत.
रेनॉल्ट कायगरच्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीला तंत्रज्ञानावर आधारित फिचर्ससह ही लोकप्रिय कार लाँच केली आहे. यासोबतच नवीन कायगरचा लूकही अपडेट करण्यात आला आहे. रेनॉल्ट कायगर पहिल्यांदा २०२१ च्या सुरुवातीला भारतात लाँच करण्यात आली होती. रेनॉल्ट कायगर जागतिक एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार सुरक्षा रेटिंगसह येते.
रेनॉल्ट कायगरचे आधुनिक फिचर्स
- कार कंपनी रेनॉल्टने आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही, कायगरची अपग्रेड केलेली आवृत्ती सादर केली आहे.
- या मॉडेलची सुरुवातीची शोरूम किंमत ५.८४ लाख रुपये आहे.
- कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कायगर एमवाय२२ हे अॅडव्हान्स फीचर्ससह सादर करण्यात आले आहे.
- यामध्ये मल्टी-सेन्स ड्रायव्हिंग मोड, केबिन स्टोरेज आणि कार्गो स्पेस समाविष्ट आहे.
- कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे मॉडेल भारताला रेनॉल्टच्या शीर्ष पाच जागतिक बाजारपेठांपैकी एक बनवण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.
- कायगर एमवाय२२ दोन इंजिन पर्यायांसह वायरलेस स्मार्टफोन चार्जिंगसारख्या इतर फिचर्ससह सुसज्ज आहे. ७. हे मॉडेल २०२१ च्या सुरुवातीला भारतात यशस्वीरित्या जागतिक स्तरावर सादर करण्यात आले.
- रेनॉल्ट इंडियाने नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियालाही या मॉडेलची निर्यात सुरू केली आहे.
फ्रेंच कार कंपनीने म्हटले आहे की, फ्रान्स आणि भारताच्या डिझाईन टीममधील परस्पर सहकार्याचा हा परिणाम आहे की रेनॉल्ट कायगरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात पहिल्यांदा सादर होणारे हे कंपनीचे तिसरे मॉडेल आहे. नंतर ते जागतिक स्तरावर लाँच केले जाईल.