थोडक्यात महत्तावाच्या 1). जळगावातील रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात पपईचा ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 2) हळदीच्या सौद्यात उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा दर मिळाला, हिंगोलीच्या मार्केट वेळात सात ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव, सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर 3) बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक, ओमकार रिअॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. 4)नवीन वाहन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित चालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चाचणी न देताच थेट लायसन्स मिळणार, यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच मसुदा अधिसूचना काढली, त्यानुुसार नवीन वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहेत. 5) मध्य मुंबईतील भोईवाडा परिसरात एका माथेफिरूने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने चार वार केले. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘ व्हॅलेंटाइन डे ‘ला हा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.