मुक्तपीठ टीम
भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गा यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्य करणे चांगलेच महागात पडले आहे. बग्गा यांच्या वक्तव्यावरून पंजाबातील मोहाली सायबर क्राईमने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत आर्क्षेपार्ह टीका करून त्यांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. बग्गा यांना अटक करण्यासाठी पंजाब पोलीस दिल्लीत पोहोचले आणि मग बग्गाच गायब असल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या. सोशल मीडियावर खूप आक्रमक असणारे बग्गा यांनी आपचे नेते अरविंद केजरीवालांवर हल्ला करणाऱ्या आतापर्यंत अनेकदा हल्ला केला होता. पण पोलीस हाती नसल्याने दिल्लीत सरकार असूनही आपला कारवाई करणं शक्य नव्हतं. आता मात्र पंजाब सारख्या पूर्ण राज्याचं सरकार हाती येताच आपने भाजपाच्या बग्गासारख्या नेत्यांना ताप देण्यास सुरुवात केली आहे.
बग्गा यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांवरही गुन्हे दाखल!
- आम आदमी पार्टीचे (आप) प्रवक्ते सनी अहलुवालिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- बग्गा यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बग्गा यांच्यावर आहे.
- दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरील वक्तव्यानंतर बग्गा यांनी यासंदर्भातील एक वादग्रस्त ट्विट केले आहे.
- बग्गा यांनी धमकीच्या स्वरात एकामागून एक ट्विट केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
स्थानिक पोलिसांना न कळवता पंजाब पोलिसांच्या अटकेच्या प्रयत्नाचा आरोप!
- तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सांगितले की, शनिवारी स्थानिक पोलिसांना न कळवता पंजाब पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते.
- पंजाब पोलिस ज्या कारमधून आले होते, त्याचा क्रमांक पीबी६५ एके १५९४ आहे.
- त्यांनी दिल्ली पोलिसांना विचारले की, मी आता लखनऊमध्ये आहे, पंजाब पोलिस मला न सांगता अटक करण्यासाठी येत आहेत.
याचे कारण मला कळू शकते. - दुसऱ्या ट्विटमध्ये बग्गा म्हणाले की, माझ्याविरुद्ध एक नाही तर १०० एफआयआर करा, पण केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाला खोटे म्हटले तर मी निषेध करेन.
- काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर ते हसत असतील तर मी निषेध करेन.
- त्यासाठी मला जे काही परिणाम भोगावे लागतील त्यासाठी मी तयार आहे.
काय म्हणाले होते केजरीवाल?
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याच्या भाजपाच्या मागणीवर हल्ला चढवला.
- ते म्हणाले होते की जर जास्तीत जास्त लोकांनी पाहावं अशी इच्छा असेल तर करमुक्त करण्यापेक्षा हा चित्रपट यूट्यूबवर टाका.
- तसेच भाजपा या चित्रपटाचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
- त्यांच्या या विधानानंतर बग्गा यांनी केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट केले होते.