मुक्तपीठ टीम
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर २५० रुपयांनी महागला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
एलपीजी सिलिंडर २५० रुपयांनी महागला!
- २२ मार्चपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहे.
- तर विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
- आज घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ९४९.५० इतकी आहे. तर, दिल्लीत ९४९.५० रुपये आहे.
- कोलकात्यात ९७६ रुपये, आणि चेन्नईमध्ये ९६५.५० रुपये आहे.
- आजच्या दरवाढीनंतर १९ किलो एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत आजपासून २२५३ रुपये मोजावे लागणार आहेत.
- तर, मुंबईत २२०५ रुपयांना १९ किलो एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.
आतापर्यंतच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती…
- १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०५ रुपयांनी वाढल्या होत्या आणि २२ मार्चला ९ रुपयांनी स्वस्त झाला होता.
- त्याचवेळी, ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७० रुपयांनी वाढली आहे.
- १ ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७३६ रुपये होती.
- नोव्हेंबर २०२१ मध्ये ते २००० झाली आणि डिसेंबर २०२१ मध्ये २१०१ रुपये झाली.
- यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी २०२२ ला ते स्वस्त झाले आणि १९०७ रुपयांवर आले.
- यानंतर १ एप्रिल २०२२ रोजी त्यांची २२५३ रुपयांवर पोहोचली.
महिना दिल्ली मुंबई
१ एप्रिल २०२२ २२५३ २२०५
२२ मार्च २०२२ २००३ १९५४.६
१, मार्च २०२२ २०१२ १९६३
१, फेब्रुवारी २०२२ १९०७ १८५७
१, जानेवारी २०२२ १९९८.५ १९४८.५
१, डिसेंबर २०२१ २१०१ २०५१
१, नोव्हेंबर २०२१ २०००.५ १९५०