Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलपीजी सिलिंडर २५० रुपयांनी महागलं, सध्या तरी १९ किलोचं कमर्शियलच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
LPG Cylinder

मुक्तपीठ टीम

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर २५० रुपयांनी महागला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

 

एलपीजी सिलिंडर २५० रुपयांनी महागला!

  • २२ मार्चपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहे.
  • तर विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
  • आज घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ९४९.५० इतकी आहे. तर, दिल्लीत ९४९.५० रुपये आहे.
  • कोलकात्यात ९७६ रुपये, आणि चेन्नईमध्ये ९६५.५० रुपये आहे.
  • आजच्या दरवाढीनंतर १९ किलो एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत आजपासून २२५३ रुपये मोजावे लागणार आहेत.
  • तर, मुंबईत २२०५ रुपयांना १९ किलो एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.

 

आतापर्यंतच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती…

  • १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०५ रुपयांनी वाढल्या होत्या आणि २२ मार्चला ९ रुपयांनी स्वस्त झाला होता.
  • त्याचवेळी, ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७० रुपयांनी वाढली आहे.
  • १ ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७३६ रुपये होती.
  • नोव्हेंबर २०२१ मध्ये ते २००० झाली आणि डिसेंबर २०२१ मध्ये २१०१ रुपये झाली.
  • यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी २०२२ ला ते स्वस्त झाले आणि १९०७ रुपयांवर आले.
  • यानंतर १ एप्रिल २०२२ रोजी त्यांची २२५३ रुपयांवर पोहोचली.

महिना                  दिल्ली     मुंबई

१ एप्रिल २०२२           २२५३      २२०५

२२ मार्च २०२२           २००३       १९५४.६

१, मार्च  २०२२            २०१२         १९६३

१, फेब्रुवारी २०२२      १९०७        १८५७

१, जानेवारी २०२२       १९९८.५      १९४८.५

१, डिसेंबर  २०२१        २१०१             २०५१

१, नोव्हेंबर २०२१      २०००.५          १९५०


Tags: commercial cylinderdelhilpg cylindermumbaiएलपीजी सिलिंडरदिल्लीमुंबईव्यावसायिक सिलिंडर
Previous Post

कृष्णातिरी कला-संस्कृती आणि खाद्योत्सवाची बहार!

Next Post

#मुक्तपीठ LiVE #परीक्षापेचर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थी-पालक-शिक्षकांशी संवाद

Next Post
#मुक्तपीठ LiVE #परीक्षापेचर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थी-पालक-शिक्षकांशी संवाद

#मुक्तपीठ LiVE #परीक्षापेचर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थी-पालक-शिक्षकांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!