मुक्तपीठ टीम
देशातील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेडचा २०२० मध्ये सुमारे १० अब्ज डॉलर्स जवळपास ७२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. या विक्रमी उत्पन्नानंतर कंपनीने आपल्या कर्मचार्यांना ७०० कोटींचा वन टाइम विशेष बोनस जाहीर केला आहे. त्याचा फायदा जगभरात कार्यरत १ लाख ५९ हजार ६८२ कर्मचार्यांना होईल.
१ वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षे एचसीएलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळेल. बोनसची रक्कम १० दिवसांच्या पगाराइतकी असेल. याच महिन्यात कर्मचार्यांना हा विशेष बोनस मिळेल. काही देशांमध्ये पे-रोलसह बोनसवर सुमारे ९० दशलक्ष डॉलर्स जवळपास ७०० कोटी खर्च केले जातील.
एचसीएलचे मुख्य एचआर व्हीव्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कर्मचारी त्यांच्यासाठी सर्वात मूल्यवान संपत्ती आहेत. कोरोना महामारी असूनही, एचसीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याने संस्थेच्या वाढीस पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
एचसीएल भरभराटीची कथा…
- डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या डॉलरच्या उत्पन्नामध्ये वर्षाकाठी ३.६% वाढ झाली आहे.
- कोरोना काळात कंपनीच्या डिजिटल सेवांची मागणी वाढली आणि नव्या व्यवहारामुळे एचसीएलचा महसूल १० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
- एचसीएल टेक्नॉलॉजीने डिसेंबर तिमाहीत १३ व्यवहार केले आहेत.
- बहुतेक व्यवहार सायन्स, आरोग्य सेवा, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा उद्योगात आहेत.
- एचसीएलच्या डिजिटल व्यवसायात २५% महसूल वाढला आहे.