मुक्तपीठ टीम
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी नागरिकांना परिश्रमाचा सल्ला दिला आहे. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवावे लागेल, त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे रामदेव बाबांनी सांगितले आहे. कर्नालमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, माझ्यासारखा संन्यासीही कठोर परिश्रम करू शकतो. या महागाईचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांना खूप मेहनत करावी लागेल.”
देश चालवण्यासाठी कर भरावा लागतो, जर मी संन्यासी म्हणून १८ तास काम करू शकतो, तर लोकांनीही मेहनत करावी, असे रामदेव म्हणाले. खरे तर बाबांना त्यांच्या आधीच्या विधानाबद्दल विचारण्यात आले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास इंधनाचे दर कमी होतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून महागाईचा भडका रोजच जाणवताय…
- रामदेव हेलिकॉप्टरने कर्नाल येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.
- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
- सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून दररोज महागाई वाढत आहे.
- आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले, तेव्हा जयपूर-अहमदाबाद ते पाटणा आणि भोपाळ ते चेन्नईपर्यंतच्या पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला.
- मुंबईतही डिझेलने आता १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
- दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ झाल्यानंतर ते १०१.८१ रुपयांवर पोहोचले आहे.