Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यसभेतील ७२ खासदारांना निरोप! कपिल सिब्बल, डॉ.स्वामींपासून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, संभाजीराजे छत्रपतींपर्यंत कुणाची मुदत कधी संपणार?

March 31, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Piyush Goyal Sanjay raut Sambhaji chhattrapati And vikas mahatme

मुक्तपीठ टीम

राज्यसभेतील काही सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. आज राज्यसभेत एकूण ७२ खासदारांचा निरोप संभारंभ पार पडला. महाराष्ट्रातीलही अनेक खासदार आज निवृत्त होत आहेत. या सर्वांच्या निरोप संभारंभाच्याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सभागृह नेते पियुष गोयल आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित आहेत. गुरुवारी सभागृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास नसल्याची घोषणा अध्यक्ष नायडू यांनी बुधवारी सभागृहात केली होती. निरोप समारंभात विविध पक्षांचे नेते आणि सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे. या निमित्ताने राज्यसभेतील कोणत्या खासदाराचा कालावधी कधी संपणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

 

जाणून घ्या कुणाकुणाचा कार्यकाळ संपणार…

एप्रिल

  • एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे सभागृहातील उपनेते आनंद शर्मा, एके अँटनी, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी, एमसी मेरी कोम आणि स्वप्न दासगुप्ता यांचा समावेश आहे.

जून

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सुरेश प्रभू, एमजे अकबर, जयराम रमेश, विवेक तन्खा, व्ही. विजयसाई रेड्डी यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे.

जुलै

  • जुलैमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये संजय राऊत,संभाजी छत्रपती, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, कपिल सिब्बल, सतीश चंद्र मिश्रा, प्रफुल्ल पटेल आणि केजे अल्फोन्स यांचा समावेश आहे.

 

कोण परतणार, कोण नाही?

  • पियुष गोयल, निर्मला सीतारामन यांच्यासारखे काही केंद्रीय मंत्री आणि काही भाजपा नेत्यांना पुन्हा उमेदवारी मिळणे नक्की मानले जातं.
  • शिवसेनेच्या संजय राऊतांचा राज्यसभा पुनरागमन हमखास होणार असल्याचं मानलं जातं.
  • राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
  • त्याचवेळी काँग्रेसच्या काही सदस्यांच्या फेरनियुक्तीबाबत स्थिती स्पष्ट नाही.यातील अनेक सदस्य असंतुष्ट गटांचा भाग आहेत ज्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे.

राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा!

  • राज्यसभेमध्ये सदस्यांची संख्या २५० इतकी असते.
  • यापैकी २३८ सदस्यांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील विधिमंडळं करतात.
  • तर १२ सदस्य राष्ट्रपती नियुक्त असतात.
  • राष्ट्रपती विविध क्षेत्रातील १२ लोकांची निवड राज्यसभेवर सदस्य म्हणून करु शकतात.
  • राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.
  • कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडून दिले जातात.
  • राज्यसभेत जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
  • राज्यांच्या विधानसभेतील सदस्य राज्यसभेच्या उमेदवारांसाठी मतदान करु शकतात.

 

#मुक्तपीठ LiVE राज्यसभेतून ७२ खासदारांची निवृत्ती…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांची भाषणं

 


Tags: finance minister nirmala sitharamanKapil Sibalmp sambhaji chhatrapatipiyush goyalsanjay rautअर्थमंत्री निर्मला सीतारामणपीयूष गोयलसंजय राऊतसंभाजी छत्रपती
Previous Post

साठ्ये महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. दत्तात्रय नेरकर याना राष्ट्रीय पातळीवरील ‘ उत्कृष्ट आय. क्यू. ए. सी. समन्वयक’ पुरस्कार!

Next Post

रामदेव बाबांचा भारतीयांना फुकटचा सल्ला: “पेट्रोल डिझेल महागत आहे, तर जास्त कष्ट करा, उत्पन्न वाढवा!”

Next Post
ramdev baba

रामदेव बाबांचा भारतीयांना फुकटचा सल्ला: "पेट्रोल डिझेल महागत आहे, तर जास्त कष्ट करा, उत्पन्न वाढवा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!